Hot Posts

6/recent/ticker-posts

आधुनिक युगातील सानेगुरूजी म्हणजे विठ्ठल जोशी

 आधुनिक युगातील सानेगुरूजी म्हणजे विठ्ठल जोशी

श्रेय मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब
ह.भ.प.चैतन्य महाराज देगलूरकर व ह.भ.प.प्रसाद महाराज अंमळनेकर यांच्याहस्ते त्यांचा सन्मान झाला

            पंढरपूर (कटुसत्य वृत्त)- सानेगुरूजींनी हरिजनांना मंदिरात प्रवेश बडवे/उत्पात कमिटीच्या सहकार्याने घडवून आणला. असा उल्लेख भेटवा विठ्ठला या पुस्तकातून पुर्व संपादक विद्याधर ताठे व रविंद्र गोळे (सहकार्यकारी संपादक विवेक) यांनी केलेला आहे. आज त्या गोष्टीला 75 वर्षे पुर्ण झाली.मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळाला परंतू त्यांच्या हातून विठ्ठलाची नित्य महापुजा आजतागायत कधीही झालेली नाही. कोरोना काळात मा.मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी सर्व मंदिरामध्ये पुजारीच नित्यपुजा करतील असे आदेश काढल्याने आधुनिक युगातील साने गुरूजी म्हणजेच उपजिल्हाधिकारी विठ्ठल जोशी यांनी भाविकांच्या नित्यपुजेमुळे कोरोनाचा प्रसार होईल म्हणून मंदिरातील सुमारे 350 ते 400 कर्मचाऱ्यांमध्ये जात, पात, धर्म, लिंग याचा भेद न करता मंदिरातील शिपायापासून व सुरक्षा रक्षक सेवानिवृत्त माजी सैनिकापासून क्लार्क खाते प्रमुख यांना कुटूंबियांसहीत संधी देवून त्यांच्याहस्ते नित्यपुजा करून घेतली हे संपूर्ण महाराष्ट्राने टीव्हीच्या माध्यमतून उघड्‌याने डोळ्याने पाहिलेले आहे. या कामामध्ये त्यांना सध्याचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनीही मोलाचे सहकार्य केले.

            तसेच त्यांना विठ्ठलाचे पंचामृत, लाडू, महानैवेद्य तसेच त्यांचा हार श्रीफळ प्रसाद देवून त्यांचा सन्मान केलेला आहे. त्यामुळे त्यांना आधुनिक युगातील सानेगुरूजी म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तसेच त्यांच्या निरोप समारंभास आवर्जून व त्यांच्या कार्याला सुयश व आशिर्वाद देण्यासाठी ह.भ.प.चैतन्य महाराज देगलूरकर , ह.भ.प.प्रसाद महाराज अंमळनेरकर, ह.भ.प.ज्ञानेश्वर जळगांवकर महाराज व विठ्ठल मंदिरातील सुमारे 400 कर्मचारी आपल्या संपूर्ण कुटूंबियांसहीत उपस्थित राहिले होते. अशा निस्पृह अधिकाऱ्यास येत्या 15 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी विशेष सन्मान करावा. सध्या ते पिंपरी चिंचवड येथे उपायुक्त म्हणून काम करीत आहेत. सानेगुरूजींच्या मंदिर प्रवेशाला 75 वर्ष पुर्ण झाल्याच्या कार्यक्रमात सर्व आयोजकांना यांचा विसर पडलेला आहे. सदर कार्यक्रमात यांचा सन्मान होणे गरजेचे होते, अशी प्रतिक्रिया सोलापूर जिल्हा कॉंग्रेस ब्राह्मण सेलचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय बडवे - शिंदे यांनी दिली.

Reactions

Post a Comment

0 Comments