Hot Posts

6/recent/ticker-posts

महापालिकेने ६ महिन्यांपूर्वी स्ट्रीट बझारमधील स्टॉल आणि जागांचा लिलाव;अवघ्या दोन तासांत लिलाव पूर्ण

महापालिकेने ६ महिन्यांपूर्वी स्ट्रीट बझारमधील स्टॉल आणि जागांचा लिलाव;अवघ्या दोन तासांत लिलाव पूर्ण

              सोलापूर (कटूसत्य वृत्त):- स्ट्रीट बझारमधील १८ स्टॉल आणि ३१ जागांचा लिलाव अवघ्या दोन तासांत पूर्ण झाला. विक्रेत्यांनी साखळी करून ६ हजार ४५० रुपये या आधारभूत किमतीपेक्षा एक रुपये जादा बोली न लावता या जागा मिळविल्या. यापूर्वी एका जागेसाठी २५ हजारपेक्षा अधिक बोली लागली होती हे विशेष.महापालिकेने सहा महिन्यांपूर्वी स्ट्रीट बझारमधील २० स्टॉल आणि १५ जागांचा लिलाव पुकारला होता.हुल्लबाजीत अनेकांनी १५ ते २५ हजार रुपयांपर्यंतची बोली लावली.यापैकी केवळ दोन जणांनी दुकाने सुरू केली.उर्वरित लोकांनी सुविधा मागितल्या.आयुक्तांनी आहे त्या स्थितीत स्टॉल आणि जागा असे सांगितले कब्जा पावतीसाठी भरलेले दोन महिन्यांचे भाडेही जप्त केले. आठ दिवसांपूर्वी पुन्हा लिलाव पुकारला होता. या लिलावाला प्रतिसाद मिळाला नाही. अखेर शुक्रवारी तिसऱ्यांदा लिलाव झाला. विक्रेत्यांनी साखळी करून बोली लावली.हुल्लडबाज लोकांवर लक्ष ठेवले. या लिलावात ४९ जणांनी भाग घेतला. २० स्टॉलपैकी सात स्टॉल गारमेंट, हातमाग कापडासाठी, तीन स्टॉल ज्वेलरीसाठी पाच स्टॉल हातमागासाठी, पाच स्टॉल खाद्यपदार्थांसाठी आहेत. ३२ जाग खाद्यपदार्थांसाठीच आहेत. अपसेट प्राईस वरचे लिलाव पूर्ण झाला. दोन् महिन्यांचे आगाऊ भाडे घेऊन ताब दिला जाणार आहे. स्ट्रीट बझारवड आता बाजार सुरू होण्याची आशा आहे या जागा ११ महिने कराराने दिल्य आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments