सोलापूर तालुका पोलीस स्टेशनची दमदार कारवाई ; १ कोटी ७४ रुपयांचा गुटखा जप्त...

सोलापूर(कटूसत्य वृत्त):- दिनांक २०.०५.२०२२ रोजी सोलापूर तालुका पोलीस ठाणेकडील डी.बी. पथकातील अंमलदार सोलापूर तालुका पोलीस ठाणेच्या हद्दीतील पाकणी ता उत्तर सोलापुर भागात पेट्रोलिंग करीत असताना सत्य साई कार्तीक परि.सहायक पोलीस अधीक्षक, सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांना त्याचे गोपनिय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, तेरा मैल मंदुप येथुन कंटेनर क्रमांक एम. एच. ४६ ए. एफ. ६११७ व एच.आर. ३८-एक्स. ८०५१ या दोन्ही वाहना मध्ये गुटखा भरून ते तुळजापूरच्या दिशेने जात आहेत. सदरची दोन्ही वाहने मिळुन आलेस ती ताब्यात घेऊन त्यांची तपासणी करणेस कळविले वरून बातमी मध्ये दिलेल्या वर्णनाची दोन्ही वाहने डीबी पथक अंमलदार यांनी पाकणी येथील वासुदेव हॉटेल जवळ पकडली. तेथे हजर असलेल्या चालक इसमाना सदर कंन्टेनर मध्ये काय आहे याबाबत विचारले असता त्यांनी सुरुवातीस उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने त्या इसमाचा संशय आल्याने सदर कंन्टेनरची पोलीसांनी पाहणी केली असता त्यामध्ये पांढरे रंगाचे पोत्यामध्ये गुटखासदृष्य (तंबायुक्त पदार्थ) माल भरलेला असल्याचे दिसुन आले. त्यानंतर सदरचे दोन्ही कंन्टेनर सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे लावण्यात येवुन त्यामध्ये असलेल्या मालाची पाहणी केली त्याचे वर्णन खालील प्रामणे. सदर ठिकाणी खालील प्रमाणे नमूद प्रमाणे गुटखा व वाहने मिळून आले आहेत.सदर ठिकाणी मिळून आलेल्या १ कोटी ७४ हजार रुपये किंमतीचा अवैध गुटखा (तंबाखुयुक्त पदार्थ) दोन कंन्टेनर अंदाजे किंमत ४५०००००/- रु. असा एकूण १ कोटी ४५ लाख ७४ हजार रुपये किमंतीचा गुटखासदृष्य माल व वाहने यावेवर कारवाई करणे करीता अन्न व प्रशासन विभाग सोलापूर यांना कळविले.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम, अपर पोलीस अधीक्षक हिमंतराव जाधव सो, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती याचे मार्गदर्शनाखाली सत्य साई कार्तीक(भापोसे) परि. सहायक पोलीस अधीक्षक सोलापूर तालुका पोलीस ठाणे याचे नेतृत्वाखाली सपोनि / प्रविण संपागे, पोहेकॉ/३७४ संजय देवकर, पोना/१८०५ आनंत चमके, पोना/१५८८ नागेश कोणदे, पोना/९३९ गणराज जाधव, पोकॉ/८०३ रविंद्र साबळे, पोकॉ/१३५८ सिध्दनिंगप्पा बिराजदार, चालक पोहवा/१४१ कानडे यांनी बजावली आहे.
0 Comments