हुतात्मा एक्स्प्रेस बंद असल्याचा प्रवाशांना फटका
.png)
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- सोलापूरकरांची आवडती रेल्वेगाडी हुतात्मा एक्स्प्रेस बंद असल्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. अव्वाच्या सव्वा दर आकारणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांची दिवाळी सुरू आहे.तर तिप्पट पैसे द्यावे लागत असल्याने नडलेल्या प्रवाशाचे दिवाळे निघत असल्याची स्थिती आहे. पुण्याला जाण्यासाठी एक हजार ते दीड हजार रुपये मोजावे लागत आहेत.एसटी महामंडळाने पुण्याला जाण्यासाठी गाड्यांची संख्या वाढवली असली तरी प्रवाशांची मोठी संख्या पाहता महामंडळाची सेवा अपुरी पडत आहे. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांकडे गर्दी वाढत आहे. त्यामुळे बहुतांश ट्रॅव्हल्स वाले एरव्ही पेक्षा तिप्पट पैसे आकारत आहेत. यात पावसाळी वातावरणाने भर पाडली आहे. यामुळे स्लीपिंग सीट्सला मागणी अधिक आहे. शिवाय त्याचेही दर वाढले आहेत.सोलापूरच्या रेल्वे विभागाने दौंड येथील काही तांत्रिक कामामुळे हुतात्मा एक्स्प्रेस बंद केली आहे. ती हुतात्मा एक्स्प्रेस २९ मेपर्यंत बंद असणार आहे. त्यामुळे सहाजिकच सोलापूरला येणाऱ्या आणि पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांचा भार एसटी महामंडळावर आणि खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांवर आला आहे. मात्र या आलेल्या ताणाचा गैरफायदा उचलत अनेक खासगी ट्रॅव्हल्स कंपनी दरात अव्वाच्या सव्वा वाढ होऊन सामान्य नागरिकांची लूट करत आहेत.
0 Comments