पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी टॅंकरच्या मागे लागले
.png)
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दोन तीन दिवसांपूर्वी सकाळच्या वेळी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यांतील पुणे-औरंगाबाद महामार्गावरील सरदवाडी या गावातून प्रवास करताना पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी टॅंकरच्या मागे लागलेली आबालवृद्धांची झुंबड पाहिली.खरं तर शिरूर तालुक्यांतील ८०% हून अधिक भाग हा ओलिताखाली आला आहे. अशा जलसंपंन्न तालुक्यात पिण्यासाठी पाणी नाही व लोकांना टॅंकरची वाट पहावी लागते हे दुर्दैवी चित्र आहे. इथे पाण्याची उपलब्धता नाही असे नाही तर उपलब्ध पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. अन्यथा नियोजनाअभावी जनतेचे हाल होत राहणार हेच यातून स्पष्ट होते.
0 Comments