फळभाज्यांचा जॅकेट परिधान करून महागाई विरोधात तीव्र निषेध
.png)
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महागाईविरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी रस्त्यावर उतरून केंद्र सरकारचा निषेध नोंदविला विविध फळभाज्यांचा जॅकेट परिधान करून महागाई विरोधात तीव्र निषेध नोंदविला. महागाई कमी व्हायला पाहिजे तसेच देशभरातील बेरोजगार युवकांना नोकऱ्या द्या, याह विविध मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांना देण्यात आले.माजी आमदार नरसय्या आडम, एम.एच. शेख यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी कार्यकर्ते लाल झेंडे व निषेधाचे फलक, पालेभाज्या,फळभाज्यांचे हार, बेरोजगारीचे प्रतिकात्मक लक्षवेधी जॅकेट परिधान करून कार्यकर्त्यांनी गगनभेदी आवाजात सरकार विरोधात घोषणा दिल्या. आंदोलनात सिद्धप्पा कलशेट्टी,नलिनी कलबुर्गी, युसूफ मेजर, सुनंदा बल्ला, जनवादी महिला संघटनेच्या राज्याध्यक्ष माजी नगरसेविका नसीम शेख, व्यंकटेश कोंगारी, शेवंता देशमुख,रंगप्पा मरेड्डी, हनिफ सातखेड, शंकर म्हेत्रे, अनिल वासम दीपक निकंबे,डीवायएफआयचे राज्य उपाध्यक्ष विक्रम कलबुर्गी, अनिल वासम,दिव्यांग संघटनेचे अकिल शेख,इलियास सिद्दीकी, आसिफ पठाण,बापू साबळे, फातिमा बेग, विक्रम कलबुर्गी, वसीम मुल्ला, सनी शेट्टी,आपशा चांगले अमित मंचले, श्रीकांत "कांबळे, नागमनी दंडगळ, संगीता एडके,साहेरा शेख, आरिफा शेख, बीबी तारकश नरेश गुलापल्ली, शाम आडम,अफसाना बेग, मधुकर चिल्लाळ,अस्लम मुजावर, अकील पटेल, डेव्हिड शेट्टी, बालाजी म्हेत्रे, प्रभाकर गेंत्याल,कुमार येलगेटी, तिप्पांना पेद्दी, सद्दाम बागवान, हणमंत पेद्दी, राजू सीता, नाणी माकम, राहुल बुगले, प्रकाश जगले,श्रीनिवास गोन्याल, शफी शेख, राजू गेंट्याल बालाजी तुम्मा आदी सहभागी झाले होते.
0 Comments