यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या आयआयएमएस तर्फे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन
पुणे (कटुसत्य वृत्त): कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस)चे संचालक डॉ.शिवाजी मुंढे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी आपल्या मनोगतात डॉ. शिवाजी मुंढे यांनी सांगितले की, “कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनकार्यातून आपण सर्वांनी प्रेरणा घेऊन श्रमप्रतिष्ठा व ज्ञानार्जनाच्या साहाय्याने विद्यार्थ्यांनी स्वावलंबी बनले पाहिजे”.
याप्रसंगी यशस्वी एकेडमी फॉर स्किल्सच्या अप्रेन्टिस विभागाचे संचालक संजय छत्रे,चंद्रकांत बोरकर,नितीन थेटे, आदिती चिपळूणकर व पवन शर्मा उपस्थित होते.
0 Comments