Hot Posts

6/recent/ticker-posts

सांगोला - कन्याकुमारी दहा दिवसात सायकलने प्रवास

सांगोला - कन्याकुमारी दहा दिवसात सायकलने प्रवास


सांगोल्यातील नीलकंठ शिंदेनी रचला सायकलचा इतिहास...

            सांगोला (कटुसत्य वृत्त): सांगोल्यातील नीलकंठ शिंदे सर व त्यांच्या 24 सहकाऱ्यांनी सांगोला ते कन्याकुमारी सह संपूर्ण दक्षिण भारत असा खडतर सायकल प्रवास पूर्ण केला आहे. निसर्गाने आपल्याला भरपूर दिले आहे. लोकांनी दैनंदिन कामासाठी सायकलचा अधिक वापर करून प्रदूषण कमी करून त्याची भरपाई करावी. सुज्ञ नागरिक म्हणून आपलीही जबाबदारी निसर्गाला जपण्याची आहे. वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून सायकल चालवावी जेणे करून इतर लोकांना त्रास होणार नाही आणि अपघात टळू शकेल. या उद्देशाने सांगोला -कन्याकुमारी पर्यावरण बचाव 2022 सायकल रॅलीचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. सोलापूर, सातारा व पुणे जिल्हा येथील सायकल सदस्य एकत्रित येऊन या महराईड योजना 10 एप्रिल पासून करण्यात आली होती. सांगोला- कन्याकुमारी साधारण १४५० किलोमीटर प्रवास त्यांनी दहा दिवसांमध्ये पूर्ण केला .सायकल राईडची आवड असल्याने कोरोना पूर्वी शहर व परिसरात नीलकंठ शिंदे सर हे शाळेत जाण्यासाठी सायकल वापरायचे. या आधी सांगोल्यातून देहू ,आळंदी , पुणे, कोल्हापूर, अक्कलकोट, नळदुर्ग, सातारा, उस्मानाबाद, लातूर, मिरज ,सांगली, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा अशा भागात त्यांनी सायकल राईड केले आहेत .तसेच सांगोला पासून नजीक असलेली पंढरपूर, माचणुर, अकलाई, पखालपुर शुक्राचार्य, जत, वेळापूर, येडशी, तुळजापूर, गोंदावले, म्हसवड, मंगळवेढा, बाळे अशा विविध ठिकाणी सायकलने प्रवास करून निसर्गाला जपण्याचा संदेश त्यांनी दिला आहे.

            सायकल प्रवास - नीलकंठ शिंदे सर हे सोलापूर जिल्हा सायकल असोसिएशनचे सदस्य आहेत. श्रीरामनवमी प्रभू रामचंद्र यांच्या जन्मदिनी कन्याकुमारी करता प्रवासाची मुहूर्तमेढ रोवली. सांगोल्यातील ग्रामदैवत अंबिकादेवी व ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या पदस्पर्शाने सुरू झालेला प्रवास दहा दिवसांनी म्हणजेच 19 एप्रिल अंगारकी चतुर्थी दिवशी सकाळी साडेनऊच्या सुमारास पूर्ण केला. दक्षिण भारतातील 5 राज्यांची शहरे तेथील लोकजीवन त्यांनी पाहिले, संस्कृतीचे अवलोकन केले .त्यामुळे विजापूर, अलमट्टी ,कुडलसंगम, बदामी, हम्पी, मुधोळ ,होस्पेट ,चित्रदुर्ग ,

            यशवंतपूर  ,बेंगलोर दर्शन, सेलम, दिंडीगल ,मदुराई , आणि शेवटी कन्याकुमारी या शहरांचा समावेश आहे. या सर्व शहरांमधून प्रवास करत पर्यटन व धार्मिक स्थळांना भेटी दिल्या व प्रत्येक गावात शहरात पर्यावरण बचाव, बेटी बचाव, बेटी पढाव असा संदेश जागृत रॅलीतून दिला  सायकल प्रवासादरम्यान  लेपाक्षी येथील विरभद्र मंदिर, मदुराई येथील मीनाक्षी मंदिर येथील स्थापत्यकलेचे वैभव डोळ्यांमध्ये साठवले विशेष म्हणजे या सायकल रॅलीत वय वर्ष 10 ते 65 वर्ष  सायकल राईडर समावेश होता त्यांनी यशस्वीरित्या हा टप्पा पूर्ण केला.   या वैभवाचे निरीक्षण करण्यासाठी केंव्हा काढताय तुम्ही सायकल बाहेर. कन्याकुमारी पर्यावरण बचाव सायकल रॅलीचे सर्वत्र स्वागत झाले तसेच हि सायकल यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रमोद जं वजाळ ,डॉ. खंडेलवाल, रामचंद्र मिसाळ ,नागेश खारे, सौरभ खंडेलवाल ,गोरक्षनाथ शिंदे ,महेश ढेरे ,सयाजी माने  सिद्धेश्वर ढेरे ,मंदार घोडके, देवांश क्षीरसागर या सदस्यांचे सहकार्य लाभले. यापुढील सायकल राईड उत्तर भारतातील जम्मू काश्मीर, अमृतसर, लेह -लडाख या भागात आयोजित करणार असल्याचे नीलकंठ शिंदे सर यांनी सांगितले.

"डर के आगे जीत है" चा प्रत्यय आला:-नीलकंठ शिंदे सर

            सायकलिंग प्रवासाचा हंगाम हा उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात चांगला असतो परंतु नीलकंठ शिंदे सर व त्यांच्या टीमने उन्हाळ्यात सांगोला- कन्याकुमारी असा सायकल प्रवास केला हे आमच्या दृष्टीने मोठे आव्हान होते, या प्रवासादरम्यान जसे चांगले अनुभव आले तसे खडतर अनुभवही आले त्यावर आम्ही सर्वांनी यशस्वी मात केली या प्रवासात सर्वात मोठा अवघड टप्पा तामिळनाडू  येथील सेलम जिल्ह्यातील थोपूर घाट हा तीव्र वळण व धोकादायक उताराचा असल्याने  येथील स्थानिक पोलीस प्रशासनाकडून आम्हाला विशेष व्यवस्था पुरवण्यात आली या घाटात  L & T कंपनीकडून विशेष सहकार्य लाभले त्याच बरोबर वेळोवेळी स्थानिक प्रशासनात नागरिक यांचे सहकार्य मिळाले. याच वेळी आम्हाला संकटातून बाहेर निघाल्याने प्रत्येक अवघड गोष्टी पूर्वी डर के आगे जीत है याचा प्रत्यय आला. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी व्यायामाबरोबरच सायकलिंग देखील गरजेचे आहे असे निळकंठ शिंदे सर यांनी सांगितले.

Reactions

Post a Comment

0 Comments