Hot Posts

6/recent/ticker-posts

संस्थेतील प्रत्येकाचे योगदान हे संस्थेच्या वाटचालीत महत्वाचे असते - विश्वेश कुलकर्णी

संस्थेतील प्रत्येकाचे योगदान हे संस्थेच्या वाटचालीत महत्वाचे असते  -  विश्वेश  कुलकर्णी

यशस्वी  संस्थेचा ३८ वा  वर्धापन दिन  सोहळा उत्साहात  संपन्न

           पुणे (कटुसत्य वृत्त): दिनांक  ३ मे  २०२२ : कोणत्याही  संस्थेच्या प्रदीर्घ  वाटचालीत  त्या संस्थेतील  प्रत्येक  सदस्याचे  योगदान  हे महत्वाचे  असते. ज्या संस्थेतील  कर्मचारी  केवळ नोकरी म्हणून नाही तर ही  आपली  संस्था  आहे या भावनेने  काम करतात ती  संस्था  निश्चितच  यशस्वी  होते असे  मत  'यशस्वी' संस्थेचे  अध्यक्ष  विश्वेश  कुलकर्णी  यांनी  व्यक्त केले. 

           'यशस्वी' संस्थेच्या ३८ व्या वर्धानपदिन  सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या  कुटूंबातील सदस्यांच्या स्नेहसंमेलनात ते बोलत होते.

           यावेळी बोलताना ते म्हणाले  की, ३ मे  १९८४ ला  जेव्हा 'यशस्वी' संस्थेची सुरुवात  झाली  तिथपासून  ते आजपर्यंतचा प्रवास  हा संस्थेतील सर्वांच्या योगदानामुळेच शक्य झाला आहे.आज 'यशस्वी' संस्था देशातील  २४ राज्यात  कार्यरत आहे. जवळपास  ८० हजार विद्यार्थी संस्थेच्या माध्यमातून  विविध औद्योगिक  आस्थापनांमधून ऑन द जॉब ट्रेनिंग करीत रोजगारक्षम  होत आहेत. 'यशस्वी' संस्थेने  सुरु केलेल्या  शिका व कमवा  सारख्या योजनेतून  जवळपास २८ हजार  युवक-युवती प्रशिक्षण  घेऊन आज स्वतःच्या पायावर उभे राहिले आहेत. त्यापैकी अनेकांना  तर परदेशातील  नोकरीच्या संधी देखील  प्राप्त  झाल्या आहेत.  देशातील आर्थिक मागास घटकातील, दुर्लक्षित राहिलेल्या  युवा पिढीला स्वावलंबी  शिक्षणाद्वारे रोजगारक्षम  करावं  या हेतूने  आपली संस्था  कार्यरत आहे. विशेष  बाब म्हणजे कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारता व कोणत्याही शासकीय  निधी शिवाय हे कार्य  अव्याहत सुरु आहे. आजच्या या स्नेहसंमेलनामुळे पुन्हा एकदा आणखी जोमाने काम करण्याचा  एक विश्वास  जागृत  झाला  आहे.संस्थेतील सर्व सदस्यांच्या 

           सहकार्याने भविष्यातील  प्रवास आणखी  यशस्वी  होईल अशी  खात्री बाळगतो  असे  सांगत  विश्वेश  कुलकर्णी  यांनी सर्वांना वर्धापनदिन सोहळ्याच्या  शुभेच्छा  दिल्या. 

           याप्रसंगी संस्थेत  वीस  वर्षांहून  अधिक काळ  सेवा केलेल्या  अलीम  शेख, मकरंद  जोशी, विलास कुंभार व तुकाराम चौधरी  यांच्या  पत्नी रंजना चौधरी  यांच्या  हस्ते 'यशोगाथा' या विशेषांकाचे  प्रकाशन  करण्यात  आले. तसेच  यावेळी संस्थेत  प्रदीर्घ  काळ  सेवा केलेल्या कर्मचारी  सदस्यांचा  विशेष प्रशस्तीपत्र  देऊन  सन्मान  करण्यात  आला. याशिवाय टेक्सटाईल  स्केटर  स्किल कौन्सिलसाठी  राष्ट्रीय  पातळीवरील  अप्रेन्टिस  योजनेतील  अभ्यासक्रम तयार  केल्याबद्दल संस्थेचे  प्रशिक्षक  अमर  सावंत  व मेघा बोरकर  यांचाही  संस्थेचे  अध्यक्ष  विश्वेश  कुलकर्णी  यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र  देऊन  सन्मान  करण्यात  आला. 

           यानंतर  संस्थेतील कर्मचारी  व त्यांच्या  कुटूंबातील  सदस्यांच्या  गायन  व नृत्य  कलाविष्कारांचे  सादरीकरण  करण्यात  आले. 

           या कार्यक्रमाला  'यशस्वी' संस्थेतील  सर्व  संचालक, विभाग प्रमुख, कर्मचारी  व त्यांचे  कुटुंबीय  मोठ्या  संख्येने  उपस्थित  होते. 

Reactions

Post a Comment

0 Comments