पंढरपूर व्यापारी महासंघाची नुतन कार्यकारिणी जाहीर
पंढरपूर (कटुसत्य वृत्त): पंढरपूर येथील व्यापारी महासंघाची बैठक नुकतीच संपन्न झाली. यामध्ये नुतन अध्यक्षपदी पत्रकार सत्यविजय नाभिराज मोहोळकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी सोमनाथ सदाशिव डोंबे, सचिव शिरीष औदुंबर पारसवार, सहसचिवपदी कौस्तुभ पुरूषोत्तम गुंडेवार, खजिनदारपदी माधव अनंतलाल कर्वे यांच्या निवडी करण्यात आल्या.
त्याचबरोबर सल्लागार समितीमध्ये लक्ष्मीनारायण भट्टड शेठजी, संजय देविदास भिंगे, पद्मकुमार प्रकाशचंद गांधी, दिपक रामेश्वर शेटे, अनिलकुमार दिपचंद फडे, कायदे विषयक सल्लागार म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ ऍड.अखिलेश वेळापूरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
कार्यकारिणी सदस्य म्हणून वेगवेगळ्या व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी असलेले विठ्ठल प्रसाद अनवलीकर, पांडुरंग महादेव बापट, राजगोपाल लक्ष्मीनारायण भट्टड, दत्तात्रय सुधाकर उर्फ नानामालक कवठेकर, राजीव पांडुरंग उर्फ रा.पां.कटेकर, विनोद वोहरा, विजयकुमार वसंतराव खंडेलवाल, कैलास करंडे, दिगंबर आप्पा गडम, राजेंद्र नवाळे, नंदकुमार कटप, सचिन प्रकाश म्हमाणे, राजकुमार प्रतापचंद गांधी,राजेंद्र उराडे, सतीश इदाते, शैलेंद्र विजय घोगरदरे, इकबलाभाई बागवान, संतोष विलास कंबीरे, सोमनाथ सुरेश होरणे, प्रदिप ताराचंद फडे यांची निवड करण्यात आली.
0 Comments