टेंभुर्णी शहरात"तिरसाट" चित्रपटाच्या टिम चे संभाजी ब्रिगेडच्या वतीने सत्कार समारंभ
तिरसाट" २० मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात
टेंभुर्णी (कटुसत्य वृत्त): सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर तिरसाट चित्रपटाची टीम टेंभुर्णी शहरात आले असताना सोलापूर जिल्ह्याचे संभाजी ब्रिगेड चे अध्यक्ष सचिन जगताप यांच्या ऑफिसला भेट देऊन या चित्रपटातून समाजप्रबोधनाचे कसे काम केले ते या चित्रपटाचे निर्माते दिनेश किरवे यांनी माहिती सांगितली
राज्य शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळालेले सूर्यकांत पवार यांचा मुलगा आणि राष्ट्रीय सायकलपटू नीरज सूर्यकांत अभिनयात पदार्पण करत आहे. २० मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या "तिरसाट" या चित्रपटात नीरज प्रमुख भूमिकेत असून, या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला.
दिनेश किरवे यांच्या क्लास वन फिल्मसने "तिरसाट" या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अॅड. उमेश शेडगे सहनिर्माते आहेत. निर्माता दिनेश किरवे यांनीच चित्रपटाचं लेखन केलं आहे. तर प्रदीप टोणगे आणि मंगेश शेंडगे यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे. पी. शंकरन यांनी चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केलं आहे. नीरज सूर्यकांत आणि तेजस्विनी शिर्के ही नवी जोडी या चित्रपटातून पदार्पण करत आहे. प्रेम मिळवण्यासाठी सहन करावा लागणारा विरोध, प्रेमासाठी करावी लागणारी धडपड "तिरसाट" या चित्रपटात उलगण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटातलं "उधाण आलंया, फ़र्मान आलंया, जीवाला या जीवाचं आवताण आलंया,' असे शब्द असलेलं गाणं आणि टीजर लाँच करण्यात आलं होता. या गाण्याला आणि टीजरला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. आता ट्रेलर प्रदर्शित करण्यात आल्यानं चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे. या चित्रपटात यतीन कार्येकर, ओंकार यादव, पल्लवी घुले, सुजीत चौरे, खलनायक विवेक यादव, आनंद साने, रामदेव जमदाडे, नीलिमा कामने, श्रुती उबाळे यांच्यादेखील महत्वपूर्ण भूमिका आहेत. मुराद तांबोळी, मनिषा भोसले, निलेश कटके यांनी लिहिलेल्या गीतांना पी.शंकर यांनी संगीतबद्ध केले असून चित्रपटातील गाणी सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे, गायिका मुग्धा कऱ्हाडे आणि पी. शंकर यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत.
वडिलांकडून मिळालेला खेळाचा वारसा पुढे चालवत नीरजनं सायकलिंग या खेळात नैपुण्य मिळवलं. जिल्हास्तरापासून सुरुवात करत राष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारली. मात्र खासगी कारणास्तव सायकलिंग बाजूला पडलं. एका चित्रपटाच्या निमित्ताने राज डावखरे, जय सुरवसे आणि सुरज टक्के या मित्रांमुळे नीरजची भेट दिग्दर्शक प्रदीप टोणगे आणि मंगेश शेंडगे यांच्याशी झाली. त्यानंतर नाटक आणि एकूणच मनोरंजन क्षेत्रातला नीरजचा प्रवास सुरू झाला. वऱ्हाड आलंय लंडनहूनसारखं नाटक, चांडाळचौकडीसारखा वेब सीरिज आणि शॉर्टफिम्स करत आता नीरज "तिरसाट" या चित्रपटातून पदार्पण करत आहे.
चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी संपुर्ण टीम सोलापूर जिल्ह्यात फिरत असताना टेंभुर्णी येथील संभाजी ब्रिगेड सोलापूर जिल्ह्या कार्यालयात सदिच्छा भेट दिली यावेळी चित्रपटाचे लेखक व निर्माते दिनेश किरवे यांचा सत्कार टेंभुर्णी प्रेस क्लबचे अध्यक्ष अनिल जगताप यांनी केला ,निरज पवार - अभिनेता,तेजस्विनी शिर्के - अभिनेत्री,विवेक यादव यांचा सत्कार प्रहार औद्योगिक संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमोल जगदाळे यांनी केला तर अभिनेता,गणेश जी - प्रॉडक्शन मॅनेजर, प्रकाश धिंडले-सहा.दिग्दर्शक यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप यांच्या हस्ते करण्यात आला , यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये चित्रपट आघाडीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र लोकरे,प्रहार औद्योगिक पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमोल जगदाळे,अजय गायकवाड-तालुकाध्यक्ष का.आघाडी,नितीन जाधव-महाराज हे उपस्थित होते.
0 Comments