Hot Posts

6/recent/ticker-posts

तांदुळवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी अतुल गवळी बिनविरोध

तांदुळवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी अतुल गवळी बिनविरोध

व्हा.चेअरमनपदी चंदक गवळी यांची निवड

             लऊळ(कटुसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी तसेच चळवळीची राजधानी असलेल्या तांदुळवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी अतुल गवळी यांची तर व्हाईस चेअरमनपदी चंदक गवळी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

             ग्रामपंचायत कार्यालयामध्ये नुतन संचालकांची बैठक,तसेच अध्यक्ष,उपाध्यक्ष पदाची निवड निवडणूक निर्णय अधिकारी एस.आर.मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दि.१३ मे रोजी आयोजित करण्यात आली होती.यावेळी संस्थेचे सचिव धनाजी करळे तसेच क्लार्क प्रशांत शिंदे उपस्थित होते.

             या बैठकीत तांदुळवाडी विविध कार्यकारी सहकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी अतुल विलास गवळी यांची तर व्हाईस चेअरमनपदी चंदक शिवाजी गवळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.तसेच

             नूतन संचालकपदी पांडुरंग नारायण गवळी,बळीराम मनोहर काळे,मधुकर भिमराव गवळी,केशव सोमनाथ गवळी, दत्तात्रय विनायक गवळी,दिगंबर श्रीरंग गवळी,महादेवी रामेश्वर जाधव,जयश्री महावीर पाटील,रामा जलद पवार, ऋषिकेश भानुदास सोनवणे यांची निवड बिनविरोध झाली.

             ही निवडणूक तांदुळवाडी ग्रामपंचायतचे सरपंच रणजितसिंह पाटील व रयत क्रांती संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सत्यवान जाधव यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती.या निवडणूकीवर निर्विवाद वर्चस्व मिळवत त्यांनी आपली प्रतिष्ठा कायम राखली.या निवडणुकीत किंगमेकरची भूमिका म्हणून रयत क्रांती संघटनेचे जिल्हाकार्याध्यक्ष सत्यवान जाधव,औदुंबर भोसले यांनी पार पाडली.तर कुशल मार्गदर्शक म्हणून आबासाहेब परबत,दिलीप गवळी,भारत गवळी,वशिष्ट चव्हाण,गुलाब जाधव,उपसरपंच किरण गवळी,नरसिंह कदम,डिगंबर गवळी,प्रदीप गवळी,बालाजी म.गवळी,नेताजी गवळी,अमोल गवळी,रमेश गवळी,बापूराव गवळी,विष्णू अनपट यांनी पार पाडली.

             यावेळी हरीआबा गवळी,विलास गवळी,महादेव भोसले,नानासाहेब यादव,सौदागर गवळी,विठ्ठल यादव,अंकुश गवळी,रामचंद्र गवळी,अमोल भोसले,सर्जेराव टोणपे,सदाशिव गवळी,अजित गवळी,दत्तात्रय गवळी,माधव गवळी,युवराज गवळी,ओंकार पाटील,विनोद चव्हाण,ज्ञानदेव गवळी,बिबिषण जाधव,मारुती जाधव,प्रथमेश गवळी,केतन गवळी,पंकज गवळी,भैय्या रगडे,आदी मान्यवरांसह स्थानिक ग्रामस्थ,सभासद उपस्थित होते.

             तांदुळवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सभासदांनी व ग्रामस्थांनी   आमच्यावर तसेच आमच्या युवा नेतृत्वावर विश्वास टाकत एक नवीन जबाबदारी दिली ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत अतुल गवळी हे नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असून ते निर्भिड पत्रकार तसेच उत्तम निवेदक आहेत तर वैजूनाना हे सामाजिक चळवळीतील हुशार,तज्ञ व मनमिळाऊ स्वभावाचे असून तांदुळवाडी विविध कार्य.सेवा सहकारी संस्था पुढील काळात एक नाव लौकिकरुपांमध्ये नक्कीच आपणांस पाहायला मिळेल.असा सार्थ विश्वास व्यक्त करत सरपंच रणजितसिंह पाटील यांनी सर्व बिनविरोध संचालक,मार्गदर्शक यांचे आभार मानले.

तांदुळवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सभासदांनी व ग्रामस्थांनी माझ्यावर विश्वास टाकत जबाबदारी दिली ती खंबीरपणे पार पाडत सर्व सभासदांना न्याय देत संस्थेचे व सभासदांचे हित जोपासण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असुन तांदुळवाडी विविध कार्यकारी सेवा.सहकारी संस्थेची बिनविरोध निवडणुकीची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून कायम असून मागील २५ वर्षांपासून भगवान कृष्णा गवळी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सक्षमपणे चालू आहे.आप्पांनी घालून दिलेल्या आदर्शावरच संस्था प्रगतीपथावर चालत असून त्या जोरावरच संस्थेचे तसेच सभासदांचे हित जोपासण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. - अतुल गवळी (नूतन सोसायटी चेअरमन)

Reactions

Post a Comment

0 Comments