Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्ह्यातील ९ हजार ४३३ प्राथमिक शिक्षकांना सीएमपी प्रणालीद्वारे पगार जमा होणार

जिल्ह्यातील ९ हजार ४३३ प्राथमिक शिक्षकांना सीएमपी प्रणालीद्वारे पगार जमा होणार

             सोलापूर (कटूसत्य वृत्त):-जिल्ह्यातील ९ हजार ४३३ प्राथमिक शिक्षकांना सीएमपी प्रणालीद्वारे पगार जमा होणार आहे. राज्यात शिक्षकांना वेळेत पगार देणारी सोलापूर जिल्हा परिषद अग्रणी असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार, लेखाधिकारी रामचंद्र पाटील, विस्तार अधिकारी स्वाती स्वामी उपस्थित होते.प्रशासकीय व तांत्रिक त्रुटी दूर करून दरमहा १ तारखेला शिक्षक व केंद्र प्रमुखांचे वेतन थेट त्यांच्या वैयक्तीक खात्यात जमा होण्यासाठी अर्थ विभागाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय पवार व चंद्रकांत सुर्वे व त्यांच्या टीमने मेहनत घेतली.त्याबद्दल सीईओ स्वामी यांनी टीमचे अभिनंदन केले. यावेळी सीईओ स्वामी यांच्या हस्ते उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, लेखाधिकारी रामचंद्र पाटील,महिन्द्रा कोटक बॅकेचे शाखा व्यवस्थापक ओंकार देवळे,सहाय्यक लेखाधिकारी योगेश कटकधोंड, विलास मसलकर, दिपक शेडेयांचा सत्कार करण्यात आला.शिक्षक संघटनेचे सुरेश पवार यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षक संघटनेचे म. ज. मोरे, एकनाथ भालेराव,राम इंगळे, महादेव जठार, विठ्ठलसिंग तोवर, शहानवाज मुल्ला, विवेक लिंगराज, सुरेश पवार यांनी स्वामी यांचे स्वागत केले.

Reactions

Post a Comment

0 Comments