Hot Posts

6/recent/ticker-posts

मिळकतदारांना लाखावर वाढीव करासंदर्भात नोटिसा बजावण्यास सुरुवात

मिळकतदारांना लाखावर वाढीव करासंदर्भात नोटिसा बजावण्यास सुरुवात

               सोलापूर (कटूसत्य वृत्त):-महापालिका प्रशासनाने शहरातील सर्वच मिळकतदारांना अवाढव्य मिळकत कराच्या नोटिसा धाडल्या होत्या.यावर लोकप्रतिनिधी प्रशासन आणि आयुक्तांवर तुटून पडल्याने प्रशासन एक पाऊल मागे घेत,दुसरा योग्य निर्णय घेणार आहे.येत्या दोन दिवसात हा निर्णय प्रशासनाकडून जाहीर होणार असून,आता वाढीव बांधकाम करणाऱ्या मिळकतदारांनाच त्यांच्या नोटिसा लागू राहणार आहेत.गेल्या १५ वर्षापासून शहर व हद्दवाढ भागातील मिळकतींचे रिव्हिजन न झाल्याने प्रशासनाने सन २०१८- १९ मध्ये केलेल्या सर्वेनुसार वाढीव कर लावण्याचा निर्णय घेतला.यानुसार सुमारे लाखावर मिळकतदारांना वाढीव करासंदर्भात नोटीस बजावण्यास सुरुवात केली.यानुसार सुमारे ४५ हजार मिळकतदारांना नोटिसा बजावण्यात आल्या. या दरम्यान सुमारे ५ हजार मिळकतदारांनी महापालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत.तर पोस्टानेही हरकती स्वीकारण्यात येतील,असे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले होते. यावर सर्वच पक्षांचा उठाव झाला होता. शहरातील आमदारांनी देखील यावर योग्य निर्णय घेण्यासंदर्भात आयुक्तांशी चर्चा करून वाढीव मिळकतकर नोटिसा रद्द करून पुढील वाटण्यात येणाऱ्या नोटिसा थांबविण्यासंदर्भात मागणी केली होती. त्यावर बुधवारी रात्री उशिरापर्यंत संबंधित अधिकाऱ्यांसह बैठक घेऊन या संदर्भातील आता दिशा बदलण्याचा निर्णय घेतला आहे.यानुसार ज्यांचे वाढीव बांधकाम आहे त्यांच्या वाढीव कराच्या नोटिसा कायम राहणार असून इतर मिळकतदारांतचे मिळकत कर हे जुन्या पद्धतीनेच राहणार आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments