Hot Posts

6/recent/ticker-posts

वधुवर मेळावा ही काळाची गरज:- ॲड. प्रताप परदेशी

वधुवर मेळावा ही काळाची गरज:- ॲड. प्रताप परदेशी

पुणे  (ज्ञानेश्वर पाटेकर) :- कोरोना महामारी नंतर प्रथमच शिंपी समाजातील सर्व पोट जातीचा एकत्रित वधूवर मेळावा ना.स.प. पुणे शहर शाखेचे अध्यक्ष  संदिप लचके यांचे पुढाकाराने स्वागताध्यक्ष संजय नेवासकर, निमंत्रक दिलीपकुमार वायचळ व सुभाष पांढरकामे यांचे मार्गदर्शनाखाली नुकताच शिवशंकर सभागृह, महर्षिनगर पुणे येथे भव्य व दिव्य स्वरूपात संपन्न झाला.  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संजीवजी तुपसाखरे तर प्रमुख पाहुणे अॅड. प्रताप परदेशी, मलबार गोल्डचे प्रमुख अन्वर सर, उद्योगपती दिपक नेवासकर, एकनाथ सदावर्ते, नितीन उत्तरकर याचेसह नामदेव समाजोन्नती परिषदेचे विश्वस्त सुभाष भांबुरे (कोल्हापूर), बाळासाहेब काकडे (सांगली) ज्ञानेश्वर पाटसकर व वसंतराव खुर्द (पुणे), कोषाध्यक्ष राजाभाऊ पोरे, बापूसो बोत्रे यांचेसह महाराष्ट्रातील बहुसंख्य जिल्हाध्यक्ष व  कानाकोपर्यातून पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष संजीव तुपसाखरे म्हणाले की, कोरोना संकट मुक्तीनंतर समाजाने समाजासाठी घेतलेला पहिलाच वधूवर मेळावा हा सामाजिक उपक्रम आहे. तर वधूवर मेळावा ही काळाची गरज असून याचा शिंपी समाजाने याचा लाभ घ्यावा असे अॅड. प्रताप परदेशी म्हणाले.या मेळाव्याची वैशिष्ठ्ये म्हणजे काॅफी पे चर्चा करीता वधूवरांची स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास १००० वधूवरांनी उपस्थिती नोंदवली. लकी ड्रॉ द्वारे पाच वधू व पाच वरांना चांदीचे नाणे मलबार गोल्ड यांचे तर्फे प्रोत्साहन पर देण्यात आले. तसेच या मेळाव्यात नोंदणी केलेल्या गरजू व गरीब कुटुंबातील वधू-वरांचे मोफत विवाह लावले जातील अशी माहिती पुणे शहराध्यक्ष संदिप यांनी दिली.मेळावा यशस्वी करण्यासाठी पुणे शहराचे उपाध्यक्ष रणजित माळवदे, प्रदिप खोले, सोमनाथ मेटे, कुंदन गोरटे तसेच अक्षय मांढरे, ज्ञानेश्वर पाटेकर, स्वप्निल खुर्द, शिवाजी माळवदकर, जयंत पाटणकर, राहूल सुपेकर तर वधूवर नोंदणीसाठी प्रशांत सातपुते, विजय कालेकर, दिंगबर क्षीरसागर, रमेश हिरवे तर ऑनलाईन साठी चिन्मय निमकर, सौ. निकीता पांढरकामे, मंदार पांढरकामे याचे सह पदाधिकारी याचे कुटूंबातील महिला प्रतिनिधी यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालनाने प्रशांत सातपुते यांनी केले तर आभार प्रदर्शन पुणे शहराचे सचिव सुभाष मुळे यांनी केले. 

Reactions

Post a Comment

0 Comments