बक्षीहीप्परगे येथील राष्ट्रीय पेयजल योजनेतून होणाऱ्या कामाची चौकशी करून सुधारित निविदा काढावी
ग्रामस्थांचे जिल्हा परिषद सीईओना निवेदन

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- बक्षीहीप्परगे तालुका दक्षिण सोलापूर येथे राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या पाणी पुरवठा कामाची चौकशी करून सुधारित निविदा काढावी याबाबतीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांना ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
मंजूर योजनेतून काम करत असताना गावच्या भागातील सीताराम तांडा येथे झुकते माप देण्याचा अधिकारी कर्मचारी यांचा प्रयत्न सुरू आहे. गावची लोकसंख्या पाच हजाराच्या दरम्यान आहे व गावाला काताळे वस्ती , पांढरी वस्ती , कोळेकर वस्ती असे भाग जोडलेले असताना आणि सीताराम तांडा येथील लोकसंख्या दिडशेच्या आसपास आहे. शिवाय मागील दहा वर्षांत सीताराम तांडा व इतर तांड्यावर तीन पाणी पुरवठा योजना मंजूर होऊन काम पूर्ण झाले असून त्या उत्तमरित्या कार्यान्वित आहेत. तरीही गावासाठी मंजूर असलेल्या निधीतून निधी घेऊन जाण्याबरोबरच गावच्या पाणीपुरवठा विहिरीवरून पाणी देखील घेऊन जाण्याचा घाट विद्यमान सरपंचांनी घातल्याने गावातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये रोष निर्माण होत आहे. सीईओ साहेबानी स्वतः लक्ष घालून न्याय द्यावा असे ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य भाऊराव जाधव , शिवाजी राठोड , बालाजी यादव , माजी सरपंच शंकर यादव , गणेश शिंदे , राम जाधव , गणेश सिद्धे , रमेश राठोड , अक्षय पवार , श्रीधर यादव , नामदेव माळी , माजी सरपंच शिकूम्बर शेख , अकबर शेख , संतोष चव्हाण , अभिषेक घाडगे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावच्या पाणीपुरवठा योजनेत भ्रष्ट्राचार होत असल्याबरोबरच गावचे हक्काचे पाणी राजकीय द्वेषापोटी विद्यमान सरपंच व त्यांचे सहकारी इतरत्र वळवण्याचा प्रयत्न करत असल्या बाबत ग्रामस्थांनी वारंवार तक्रार केली. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी , पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी इत्यादींना सोबत घेऊन विद्यमान सरपंच गावच्या हक्काचे पाणी व निधी वळवून नेट आहेत. त्याबाबतीत सदरच्या अधिकाऱ्यांना वारंवार विनंती करूनही ते ऐकायला तयार नाहीत. विरोधी पक्षनेते बळीराम काका साठे यांनी देखील सांगितले तरी ऐकत नाहीत. गावचे वातावरण गढूळ करण्याला कारणीभूत हे अधिकारी आणि कर्मचारी आहेत. सीईओ साहेबानी दखल घेऊन वेळीच हा प्रकार थांबवावा. अन्यथा येत्या काळात तीव्र आंदोलन छेडू. शिवाय सदरचे काम चालू ठेवू देणार नाही.
-महेश माने , जिल्हा उपाध्यक्ष , राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर जिल्हा
0 Comments