सिध्देश्वर वनविहारामध्ये 16 मे 2022 रोजी निसर्ग अनुभव कार्यक्रम

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जंगलातील वन्यप्राणी, पक्षी आणि झाडे यांची नागरिकांना ओळ/93ख होण्यासाठी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी निसर्ग अनुभव मिळावा यासाठी सोलापूर वन विभागामार्फत सोमवार दि. 16 मे 2022 रोजी सिद्धेश्वर वनविहारामध्ये निसर्ग अनुभव कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी दिली.कार्यक्रमामध्ये वन, वन्यजीव पर्यावरण चर्चासत्र होणार आहे. सायंकाळी सहा वा. माजी मानद वन्यजीव रक्षक डॉ. निनाद शहा मार्गदर्शन करतील. त्यानंतर सर्प अभ्यासक राहुल शिंदे हे सापांबद्दल माहिती देतील. विभागीय कार्यालयातील सहायक वनसंरक्षक एल.ए. आवारे वन विभागाचे व्यवस्थापन यावर माहिती देणार आहेत. पत्रकार विनोद कामतकर हे वन्यजीव, पर्यावरण पत्रकारिता या विषयावर मार्गदर्शन करणार असून अरविंद मोटे निसर्ग संवर्धनातील माध्यमांची सकारात्मक भूमिका यावर मार्गदर्शन करणार आहेत. यानंतर सिध्देश्वर वनविहारामध्ये नाईट वॉक होईल.निसर्ग अनुभव कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदविण्यासाठी forestofficesolapur@gmail.com या ईमेलवर नाव नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी रजनीकांत जाधव (9130709140) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments