पीएम किसान योजनेंतर्गत लाभार्थ्यांनी बँक खाते आधारशी जोडा निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांचे आवाहन

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शेतकऱ्यांना पीएम किसान निधीअंतर्गत केंद्र सरकारतर्फे लाभ देण्यात येत आहे. एप्रिल 2022 नंतरच्या लाभासाठी नोंदणीकृत लाभार्थ्यांनी बँक खात्याशी आधार नंबरशी जोडून घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा पीएम किसानच्या जिल्हास्तरीय नोडल अधिकारी शमा पवार यांनी केले आहे.पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना एप्रिल 2022 नंतर जमा होणारे सर्व हप्ते आधार संलग्न बँक खात्यातून जमा होणार आहेत. ज्या लाभार्थ्यांचा डाटा एनपीसीआयशी आधार लिंक नाही, अशा लाभार्थ्यांना एप्रिल 2022 नंतरचे हप्ते जमा होणार नाहीत. संबंधित तहसीलदार तथा तालुकास्तरीय नोडल अधिकारी यांनी आधार जोडणी करण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील खाजगी, सरकारी बँकांशी समन्वय साधून तातडीने कारवाई करण्याच्या सूचना श्रीमती पवार यांनी दिल्या आहेत.कोणताही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही, याची दखल घ्यावी, असेही श्रीमती पवार यांनी सांगितले आहे.
0 Comments