उद्योग आणि व्यवसायाच्या संधी हेराव्यात, त्यातून आपले अर्थकारण मजबूत करावं - प्रवीण गायकवाड

बार्शी (कटूसत्य वृत्त):- छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी त्यांनी एक संकल्पना मांडली होती, ती म्हणजे 'अहद तंजावर तहद पेशावर,अवघा मुलुख आपला!' आता त्याच धर्तीवर आपल्या मराठी लोकांनीही ऑस्ट्रेलियापासून कॅनडापर्यंत पसरलेल्या या प्रदेशात मुलूखगिरी करावी, तिथं जाऊन नोकरी, उद्योग आणि व्यवसायाच्या संधी हेराव्यात, त्यातून आपले अर्थकारण मजबूत करावं आणि जगभर आपली कम्युनिटी फार्मिंग करावी. त्यासाठीच 'अहद ऑस्ट्रेलिया,तहद कॅनडा, अवघा मुलुख आपला! ही संकल्पना रुजवण्याचा आमचा प्रयत्न आहे.मातृभूमी प्रतिष्ठान व भगवंत मल्टीस्टेट बार्शीच्या वतीने भगवंत प्रकटोत्सव निमित्त आयोजित अहद् ऑस्ट्रेलिया
तहद् कॅनडा अवघा मुलूख आपला 'या विषयावर भगवंत व्याख्यानमालातील दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. आज हा विचार पेरला तर निदान भविष्यात तरी आमची लोकं समृद्ध व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनतील हा आमचा विश्वास आहे, असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी व्यक्त केले.अध्यक्षस्थानी पिंपरी चिंचवडचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे उद्योजक अक्षय बंडेवार, मैनुद्दीन तांबोळी, नवनाथ मुंढे, मातृभुमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष ठोंबरे,डॉ. बी. वाय. यादव, सचिव प्रताप जगदाळे, प्रदिप औसेकर आदी उपस्थित होते.गायकवाड पुढे म्हणाले, जागतिकीकरणामुळे आता जगग्लोबल झाले आहे. जगात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर उद्योग, व्यवसायआणि नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. लॉकडाऊननंतर
तर जगातल्या विविध संधी हेरण्याची आणि ख्यानमाला त्यातून आपले अर्थकारण मजबूत करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. भारताच्या तुलनेत बाहेर जगात लोकसंख्येचे प्रमाण कमी आहे, त्यामानाने संधी प्रचंड आहेत.भारतातील पंजाबी, सिंधी, केरळी, तमिळ, गुजराती, मारवाडी,इत्यादि लोकांची उदाहरणे आपल्यासमोर आहेत. या लोकांनी जगातल्या संधी हेरल्या आणि तिथे जाऊन आपले अर्थकारण मजबूत केले.यावेळी एसीपी डिसले म्हणाले, प्रत्येकाने जीवन जगत असताना आरोग्य, आर्थिक नियोजन, आनंदी रहावे व नातेसंबंध हे चार खांब भक्कम असला पाहीजे तरच आनंदी सुखी जीवनाची भक्कम इमारत उभी राहते. प्रत्येकजणांची मुलभूत प्रेरणा ही समाजाला देण्याची व काही तरी करण्याची असली पाहीजे.आपला कल निवडा, निर्णय घ्या, समाजाचे आपण काही देणं लागतो या भावनेतुन स्वयं प्रेरणा असली पाहीजे.
0 Comments