गौडवाडी येथे शेकापच्या नवयुवकांनी घेतली विकास सेवा सोसायटीची सूत्रे हाती

गौडवाडी (कटुसत्य वृत्त): आज दिनांक १९ मे २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता ग्रामपंचायत गौडवाडी येथे गौडवाडी विकास सेवा सोसायटीची चेअरमन व व्हा.चेअरमन पदाची निवडणूक प्रक्रिया उत्साहात पार पडली.या निवडक प्रक्रियेमध्ये गौडवाडीचे धाडसी नेतृत्व मा.पोपट रामचंद्र गडदे यांची चेअरमन पदी बहुमताने निवड झाली. तसेच व्हा.चेअरमन पदी वसंत (बाळू )पांढरे यांची बिनविरोध निवड झाली. हि प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी शेख साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.व निवडणूकीचे कामकाज सोसायटीचे सचिव मा.श्रीमंत व्हनमाने यांनी पार पाडले. तसेच यशवंत बाबा माळी, दत्तात्रय विष्णू गुळीग,आनंदा लक्ष्मण आलदर,चंद्रकांत सखाराम खंडागळे,ज्ञानेश्वर आनंदा गडदे,प्रकाश जगनाथ विटेकर,मंगल शंकर खरात,सर्व बिनविरोध संचालकाचे फेटाबंधून स्वागत करण्यात आले. तसेच उपस्थित सदस्यांनी नवनिर्वाचित चेअरमन व व्हा. चेअरमन व सर्व संचालक यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देवून मोठ्या उत्साहाने आतीषबाजी केली व आपला आनंद व्यक्त केला.यावेळी माजी चेअरमन तसेच वयस्कर मंडळी आणि युवक मोठ्याप्रमाणात उपस्थित राहून हि निवड प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.
0 Comments