Hot Posts

6/recent/ticker-posts

पूर्व हवेली डॉक्टर्स असोसिएशन तर्फे विनामूल्य आरोग्य तपासणी व उपचार शिबीर

पूर्व हवेली डॉक्टर्स असोसिएशन तर्फे विनामूल्य आरोग्य तपासणी व उपचार शिबीर


           लोणी काळभोर (प्रविण शेंडगे):- पूर्व हवेली डॉक्टर्स असोसिएशन ( चॅरिटेबल ट्रस्ट ) लोणी काळभोर यांच्या वतीने विनामूल्य आरोग्य तपासणी व औषोधोपचार शिबीर आयोजित करण्यात आले.

           या शिबिरात परिसरातील रहिवाशांचे ब्लड शुगर ( रक्तातील साखरेचे प्रमाण), बी.एम.आय ( शरीरातील चरबीचे प्रमाण), ब्लड प्रेशर( रक्तदाब ), ई.सी.जी. ( छातीची पट्टी), बी.एम.डी ( हाडांची घनता/ ठिसूळता तपासणी ), ब्लड ग्रुप ( रक्तगट तपासणी )ई. तपासण्या मोफत करण्यात आल्या व अठरा वर्षावरील लाभार्थींना मोफत कोविड लसीकरण करण्यात आले. या शिबिराचा 800 रुग्णांनी लाभ घेतला. तसेच शिबिरातील लाभार्थींना ऑपरेशन, रक्ततपासणी, सोनोग्राफी, एक्स-रे व इतर तपासण्यांची व पुढील उपचारांची गरज भासल्यास पूर्व हवेली डॉक्टर्स असोसिएशन च्या वतीने 10%ते 50% पर्यंत पुढील एक महिन्यापर्यंत सवलत देण्यात येणार आहे.                

           या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उदघाटन डॉ. गोपाळ मुळे, डॉ. राहुल काळभोर, डॉ. योगिनी पाटील, डॉ. वनिता काळभोर, डॉ. रतन काळभोर, डॉ. नितीन तांदळे, डॉ. सुनील गायकवाड, डॉ स्वप्नील पाटील, डॉ. राजेश्वर नांगरे यांच्या हस्ते करण्यात आले.

           तसेच या शिबिरात  फिजिशियन डॉ. तात्यासाहेब आर जाधव, डॉ. रवींद्र शिंदे, हृदयरोग तज्ञ डॉ. सुरज इंगोले, अस्थिरोग तज्ञ डॉ सचिन करकमकर, डॉ. सचिन आबणे, डॉ. संतोष ननवरे, डॉ. विशाल मुंढे, डॉ. भार्गव पाठक, सर्जन डॉ. ललित झांबरे, डॉ. शशांक अडगुडवार, स्त्रीरोग तज्ञ डॉ. योगिनी पाटील, डॉ. लवी, डॉ. सचिन सानप, कान, नाक, घसा तज्ञ डॉ. मतीन सय्यद, मानसोपचार तज्ञ डॉ. हिमांशू पेंडसे, बालरोग तज्ञ डॉ. अमोल गावडे, डॉ. पराग गाडीलकर, डॉ. गजानन चेके, नेत्ररोग तज्ञ डॉ. किरण खाडे, दंतरोगतज्ञ डॉ. संध्या कोळेकर, डॉ. अर्चना केंद्रे, त्वचारोग तज्ञ डॉ. पूजा तरंगे, डॉ. स्वप्नील पाटील, आयुर्वेद व गर्भसंस्कार तज्ञ डॉ. अनिल देशपांडे, डॉ. सचिन आरू, होमिओपॅथी तज्ञ डॉ.मनीषा जाधव इ. तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची विनामूल्य आरोग्य तपासणी करून मार्गदर्शन केले.  

           या शिबिरात पूर्व हवेली डॉक्टर्स असोसिएशन चे डॉ. विकास बनसोडे, डॉ. नितीन चौधरी, डॉ. संजय माने, डॉ. संध्या माने, डॉ. नागेश गवते, डॉ. प्रवीण धर्माधिकारी, डॉ. संदीप महामुनी, डॉ.राहुल जगताप, डॉ. ओमकुमार हालिंगे, डॉ.अमित गुप्ता, डॉ. श्रीकांत लोकरे, डॉ. रवींद्र जाधवर, डॉ. अतुल होळे, डॉ. रेणुका गाडीलकर, डॉ. स्मिता नांगरे, डॉ. ओमप्रकाश तोडकरी, डॉ.भारती बनकर, डॉ. लक्ष्मी पवार, डॉ. संतोष गायकवाड उपस्थित होते.

           या शिबिरासाठी दत्ता कामठे, संतोष क्षीरसागर, अजित कांबळे, निलेश पुडंगे, नागेश औरादे, अंजली शिंदे, अश्विनी घोडके, सुजाता कोलते, श्रीनिवास यादव, राजश्री शिंदे, अमन जामदार, परमेश्वर काळे, वैष्णवी काळभोर, मंजुषा अदुडे, गीतांजली मोरे, प्रतीक्षा लावने, सोमनाथ शिर्के, मोईन खान, ओंकार काळे, निलेश लांडगे, रोहित चंद्रा, आशुतोष कुमार, सरस्वती साळवे, किरण कुलकर्णी, सुधीर गवारी, ईश्वरी तुपे, संजना डोखे, संपदा रासकर, अनुष्का पाटील, झेनाब खान, सौरभ भुजबळ, प्रशांत राठोड, अजित जाणकार, अविनाश कुमार, नंदकुमार माने यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Reactions

Post a Comment

0 Comments