टेंभुर्णी येथे भर दिवसा तिघांवर प्राणघातक हल्ला - काँग्रेसच्या अध्यक्ष सह तिघांना अटक ; तीन फरार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, May 30, 2022

टेंभुर्णी येथे भर दिवसा तिघांवर प्राणघातक हल्ला - काँग्रेसच्या अध्यक्ष सह तिघांना अटक ; तीन फरार

टेंभुर्णी येथे भर दिवसा तिघांवर प्राणघातक हल्ला - काँग्रेसच्या अध्यक्ष सह तिघांना अटक ; तीन फरार


             टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे भावकीतील तिघांवर  सहा जणांनी   प्राण घातक हल्ला करून हॉस्पिटल मधील साहित्याचे नुकसान केल्याप्रकरणी काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमनाथ कदम व त्यांच्या दोन साथीदारांना टेंभुर्णी पोलीसांनी ताब्यात घेतले अन्य तिघे जण फरार झाले आहेत.

             याबाबत टेंभुर्णी पोलीस ठाण्याकडून मिळालेले  माहिती अशी की यशवंत सुरेश कदम हे फिर्यादी बाळासाहेब दादासाहेब कदम यांच्या घरासमोरून चालले असताना. फिर्यादीने माझ्याकडे येणाऱ्या कामगारांना कामास येण्यास का अडथळा करता असे विचारले असता. यशवंत कदम यांनी फिर्यादीस तू इथेच थांब तुला दाखवतो असे म्हणत. सकाळी सव्वा आठ वाजायचे दरम्यान फिर्यादीच्या भावकीतील सोमनाथ जयसिंग कदम, धनाजी तानाजी शिंदे, किसन विठ्ठल देशमुख यशवंत सुरेश कदम  हे सर्व रा. (झिरपे वस्ती) टेंभुर्णी यांच्या सोबत फिर्यादीच्या घरासमोर येऊन सोमनाथ जयसिंग कदम यांनी तुम्ही आम्हाला नेहमीच विरोध करता आज तुम्हाला जिवंत सोडत नाही असे म्हणत  लोखंडी रॉडने फिर्यादीचे वडील दादासाहेब कदम  यांच्या डोक्यात जोरात मारले. यशवंत कदम यांनी त्याच्या हातात असलेल्या लोखंडी पाईपने फिर्यादी बाळासाहेब कदम यांच्या हाताला मारहाण केले त्यावेळी भांडणाचा आवाज ऐकून फिर्यादीचे भाऊ उत्तम कदम हे भांडण सोडण्यासाठी आले असताना त्यांनाही धनाजी तानाजी शिंदे व किसन विठ्ठल देशमुख यांनी दगडाने मारहाण केली. या मारहाणी मध्ये फिर्यादीचे वडील दादासाहेब कदम हे चक्कर येऊन पडल्यानंतर त्यांना मारणे बंद केले. त्यानंतर फिर्यादीने व त्याचा पुतण्या प्रज्वल कदम यांनी दादासाहेब कदम यांना टेंभुर्णी येथील एका  हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले असता. वरील चार आरोपी व त्यांच्यासोबतच्या दोन अनोळखी लोकांनी पुन्हा त्या हॉस्पिटलमध्ये येऊन फिर्यादीचे वडील व भाऊ यांना मारहाण केली. यावेळी फिर्यादीचे भाऊ उत्तम कदम यांच्या डोक्यात मार लागला असून यावेळी हॉस्पिटल मधील कर्मचारी राजाराम सुतार व शितलराज साळुंखे हे भांडण सोडण्यासाठी गेले असता. त्यांनाही वरील लोकांनी मारहाण केली. तसेच यावेळी हॉस्पिटल मधील मॉनिटर, फॅन, इलेक्ट्रिसिटी बोर्ड इत्यादी सामानाची तोडफोड करून सुमारे २ लाख रुपयाचे नुकसान केले अशा आशयाची फिर्यादी बाळासाहेब दादासाहेब कदम यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यामध्ये दिली यांच्यावर भादवि कलम 307,326,324,323,506,427,452,143,147,148,149 प्रमाणे सहाजण  गुन्हा दाखल झाला असून त्यातील तिघा जणांना अटक केली असून अनोवळखी सह तिघे जण फरार असून या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages