कोरोनामुळे गेलेल्या नोकर्या पुन्हा मिळवण्यासाठी नोकरी महोत्सवाची गरज :- अजिंक्यराणा पाटील

अनगरमध्ये बाळराजे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन
350 उमेदवारांची उपस्थिती
मोहोळ (कटूसत्य वृत्त): गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारी मुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. युवक बेरोजगार झाला आहे. त्यांच्यासमोर आर्थिक संकट ओढवले आहे. अशावेळी मिळेल ती नोकरी आत्मविश्वासाने करण्याची गरज आहे नवीन नोकरी मिळवून देण्यासाठी प्रत्येक कंपनीत जाणे तरुणांना शक्य नसल्याने गेलेल्या नोकऱ्या पुन्हा मिळवण्यासाठी अशा नोकरी महोत्सवाची गरज असल्याचे मत अनगर येथील नोकरी महोत्सवाचे आयोजक अजिंक्यराणा पाटील यांनी मांडले.
लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन कै.शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात करण्यात आले होते. लोकनेते बाबुराव अण्णा पाटील यांच्या प्रतिमेच्या पूजनाने नोकरी महोत्सवाचे उद्घाटन झाले.प्राचार्य चंद्रकांत ढोले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.याप्रसंगी प्राचार्य डॉ चंद्रकांत सूर्यवंशी, प्रचार्य चंद्रकांत ढोले, मुख्याध्यापक विश्वजीत लटके, मुख्याध्यापक रामचंद्र पाटील, उपमुख्याध्यापक सीताराम बोराडे,पर्यवेक्षक शिवाजी मोटे व सर्व शिक्षक व कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.वर्कफोर्सचे एम डी रोहन कुर्री, कोठारी अॅग्रोटेक चे एच आर मॅनेजर कल्याण शेटे,फ्लिपकार्ट पुणेचे संदीप मगदूम आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
वर्कफोर्स सेंटर प्रायव्हेट लिमिटेड सोलापूर व उज्ज्वल हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस सोलापूर यांच्या सहकार्याने आयोजित या नोकरी महोत्वात 26 कंपन्यांनी सहभाग घेतला तर 450 तरुणांनी नोकरीसाठी नाव नोंदणी केली.
या मेळाव्यात प्रिसिजन क्रॅमशाफ्ट लि., सुविश इक्विपमेंट प्रा.लि,लक्ष्मी ड्रकण प्रायव्हेट लिमिटेड, कोठारी ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड, पेटीएम, जिओ मार्ट, फ्लिपकार्ट,जस्ट डायल,झोमॅटो, एस एस टी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, डेव्हलपमेंट कार्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड, लोकमान्य मल्टीपर्पज प्रायव्हेट लिमिटेड,
स्मृती ऑरगॅनिक लिमिटेड, स्वराज प्लान्ट न्यूट्रिशन प्रायव्हेट लिमिटेड, राणा डिजिटल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड,फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड, प्रभू रॉक्सेप मशनरी प्रायव्हेट लिमिटेड, श्री स्वामी समर्थ इलेक्ट्रिकल्स इंडस्ट्रीज लिमिटेड, चंद्रवर्धन ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेड,एॅक्टीव्ह पॉवर कंट्रोल, आर पी के इंडिया प्रायव्हेट लिमिटेड,महिंद्रा इंटिग्रेटेड बिझनेस सोल्युशन्स लिमिटेड या सव्वीस कंपन्यांनी सहभाग घेतला.
नोकरी महोत्सवाचे आयोजकांच्या वतीने नेटके आयोजन करण्यात आले. अल्पोपहार व जेवणाची सोय करण्यात आलेली होती.मुलाखतीच्या कार्यक्रमानंतर पात्र उमेदवारांना जागेवरच नोकरीचे आदेश देण्यात आले.
या नोकरी महोत्सव यशस्वी करण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी तरुण मंडळ अनगर, श्री अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सत्यवान दाढे यांनी सूत्रसंचालन केले तर मुख्याध्यापक रामचंद्र पाटील यांनी आभार मानले.
0 Comments