Hot Posts

6/recent/ticker-posts

उमेद अभियानात सोलापूर जिल्हा महाराष्ट्रात नंबर वन

उमेद अभियानात सोलापूर जिल्हा महाराष्ट्रात नंबर वन

              सोलापूर (कटूसत्य वृत्त):- उमेद अभियानात सोलापूर जिल्हा महाराष्ट्रात नंबर वन आहे. हे टिकून ठेवण्यासाठी शाश्वत विकासासाठी या वर्षासाठी २२५ कोटींचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. जिल्हा ग्रामीण भागातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे. उद्दिष्टपूर्तीसाठी जिल्हा परिषद प्रशासन कामाला लागले असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागात आज उमेद अभियानातील तालुका व जिल्हा स्तरावरील कर्मचारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर प्रसार माध्यमांना माहिती देताना ते बोलत होते.याप्रसंगी प्रकल्प संचालक तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, जिल्हा अग्रणी बँकेचे नाशिककर, सहायक प्रकल्प संचालक कुलकर्णी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, मीनाक्षी मडिवाळ उपस्थित होते.ग्रामीण भागातील गरिबी निर्मूलन करून महिलांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी उमेद अभियान अंतर्गत निर्माण करणेत आलेल्या स्वयंसहाय्यता बचत गट, ग्रामसंघ, प्रभाग संघ, उत्पादक गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या मार्फत महिलांना शाश्वत उपजीविकेचे स्रोत व त्यांनी तयार केलेल्या वस्तू व उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी महाजीविका अभियान राबविण्यात येत असल्याचे सीईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले. १५ ऑगस्टपर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे,असे उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, मीनाक्षी मडिवाळ यांनी सांगितले.

Reactions

Post a Comment

0 Comments