राज्य शासनाच्या ३० खाटांच्या सुसज्ज आणि अद्यावत ग्रामीण रुग्णालयाला १७ मे रोजी मंजुरी
.png)
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- माजी आमदार राजन पाटील,मोहोळचे आमदार यशवंत माने यांच्या पाठपुराव्यामुळे आज अनगर येथे राज्य शासनाच्या ३० खाटांच्या सुसज्ज आणि अद्यावत ग्रामीण रुग्णालयाला १७ मे रोजी मंजुरी मिळाली आहे.महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबतचे अधिकृत आदेश काढला असल्याची माहिती लोकनेते शुगर चे चेअरमन बाळराजे पाटील यांनी दिली.असलेल्या जिल्हा परिषदेच्या ग्रामीण आरोग्य उपकेंद्रांची संख्या पाहता या भागातील ग्रामीण रुग्णांसाठी राज्य अनगर पंचक्रोशी मध्ये सध्या शासनाच्या ग्रामीण रुग्णालयाचा दर्जाच्या आणि आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध असलेल्या शासकीय दवाखान्याची नितांत गरज होती. आ.माने यांच्यासमवेत मुंबईमध्ये यापूर्वी वेळोवेळी झालेल्या भेटीमध्ये मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे अनगर येथे ग्रामीण रुग्णालयास मंजुरी मिळण्याबाबतची मागणी सातत्याने केली होती.आ.माने यांनी आरोग्य विभागाकडे याबाबत सातत्याने प्रशासकीय पाठपुरावा सुरू ठेवला होता.या पाठपुराव्याला या मंजुरीच्या आदेशाच्या स्वरूपात यश मिळाल्याचेही पाटील यावेळी म्हणाले.
0 Comments