संविधानाच्या प्रति छापण्यासाठी सामाजिक विभाग देणार निधी

मुंबई (नासिकेत पानसरे):- भारतीय संविधानाच्या शासकीय प्रतींची मागील दोन वर्षांपासून छपाई बंद असल्यामुळे या राज्यातील अनेकांनाही व्यक्त केली नाराजी लक्षात घेता या छपाईसाठी सामाजिक न्याय विभाग लवकरच निधी देणार असल्याने संविधान प्रेमींची व आभासकांची नाराजी दूर होणार आहे .
भारतीय संविधानाला राज्यात मोठी मागणी असून निधीअभावी मागील दोन वर्षांपासून संविधानाच्या प्रतींची छपाई बंद होती परिणामी संविधान प्रेमी विविध संस्था संघटना व अभ्यासकांची यासंदर्भात मोठी नाराजी व्यक्त होत होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबईच्या नेत्या स्नेहल कांबळे यांनी आज सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन हि नाराजी त्यांच्याकडे व्यक्त केली तसेच यासाठी किमान एक कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली असता मुंडे यांनी दाखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून त्वरित निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिल्याचे कांबळे यांनी सांगितले
0 Comments