Hot Posts

6/recent/ticker-posts

सांगोला नगरपालिकेच्या विविध विकास कामांसाठी आणखी ५ कोटी रुपये मंजूर : आमदार शहाजीबापू पाटील

सांगोला नगरपालिकेच्या विविध विकास कामांसाठी आणखी ५ कोटी रुपये मंजूर : आमदार शहाजीबापू पाटील

           सांगोला (कटूसत्य वृत्त):- मागील आठवड्या मध्ये सांगोला नगरपालिकेच्या विविध विकास कामांसाठी  ५ कोटी रुपये मंजूर झाले होते त्या मध्ये  सांगोला शहरातील मुस्लिम समाजाची ४० ते ५० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ईदगाह मैदान सुशोभीकरण व रस्त्यासाठी दोन कोटी रुपये मंजूर झाले आहेत तसेच सांगोला क्रीडा संकुल शेजारील (ईदगाह मैदान) बायपास रोड ते पुजारवाडी रोड पर्यंत ९ मीटर डी.पी. रोड डांबरीकरण करणे ५० लाख., चिंचोली रोड येथील ९ मीटर डी.पी. रोड सर्वे नंबर ५१६ व ५१७ मधील रस्ता डांबरीकरण करणे ५० लाख.,  एखतपुर रोड ते ईदगाह मैदान पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे २० लाख. पुजारवाडी येथील सुधीर आहेरकर घर ते दीपक शिंदे घर ते बाळू जाधव घर ते नंदू जाधव घर ते मारुती बनकर घर ते पुजारवाडी रस्त्यापर्यंत दोन्ही बाजूंनी कॉंक्रिट गटार व डांबरीकरण करणे ४३ लाख.,  मिरज पंढरपूर रोड ते सिद्धिविनायक हाईट्स अपार्टमेंट पर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे १० लाख.,  सांगोला नगरपरिषद प्रशासकीय इमारतीमध्ये फर्निचर करणे ५० लाख.,  पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहाचे (टाऊन हॉल) नूतनीकरण करणे १ कोटी.,  नगरपरिषद मालकीच्या गाळ्यांच्या फर्निचर करून अभ्यासिका तयार करणे २७ लाख इत्यादी ५ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांना वरील प्रमाणे निधी मंजूर झाला आहे व आमदार शहाजीबापू पाटील यांनी मागणी केल्याप्रमाणे राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगोला शहरातील विकास कामांना अधिकचा आणखी ५कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली या मध्ये सांगोला शहरातील१ )वीरशैव लिंगायत समाजासाठी नगरपालिका जागेमध्ये बहुउद्देशीय सभागृह बांधणे ५० लाख रुपये 2) पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहाचे दुरुस्ती करणे १कोटी रुपये ३) एकतपुर रोड येथील आरक्षण क्रमांक ६३ मधील बगीच्या विकसित करणे ५० लाख रुपये ४) एखतपूर रोड येथील आरक्षण क्रमांक ६३Aमधील भाजी मंडई (व्हेजिटेबल) मार्केट विकसित करणे ५०लाख रुपये.५) सांगोला नगरपरिषद हद्दीतील विविध ठिकाणी अंतर्गत पाणीपुरवठा वितरण नलिका टाकणे १कोटी५०लाख रुपये ६) खडतरे गल्ली येथे बहुउद्देशीय सभागृह बांधणे ३०लाख रुपये ७) मिरज रोड ते राऊत मळ्याकडे जाणाऱ्या ९ मीटर डीपी रोड ओढ्यावर  पूल बांधणे ७०लाख रुपये असे ५कोटी रुपये आणखी मंजूर झाले असून  लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून या कामांची सुरुवात करून वेळेमध्ये गुणवत्तापूर्ण काम करण्याच्या सूचना आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांना दिल्या आहेत.

           तसेच यावर्षी सांगोला शहरातील विविध विकास कामांसाठी १०कोटी व गेल्या वर्षी बायपास रस्त्यासाठी ५कोटी तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील धान्य बाजार शेजारील शॉपिंग सेंटर साठी ५कोटी असे मागील  वर्षापासून नगरविकास विभागाकडून आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मागणी वरून राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या कडून सांगोला नगरपालिकेसाठी २०कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याने सांगोला शहराचा सर्वांगीण विकास होणार असल्याचे मत यावेळी आ. शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केले

Reactions

Post a Comment

0 Comments