Hot Posts

6/recent/ticker-posts

सांगोल्याचे अन्न निरीक्षक निद्रावस्थेत

 सांगोल्याचे अन्न निरीक्षक निद्रावस्थेत




 पान टपरीमधुन खुले आम मिळतोय गुट्खा

सोलापूर  (कटूसत्य वृत्त):-  सांगोला शहर आणि तालुक्यात प्रत्येक चौकाचौकात उभ्या असणाऱ्या पान  टपऱ्या मधून खुलेआम सुगंधित पान मसाल्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात गुटखा विकला जात आहे.यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची जबाबदारी  फुड अँड  ड्रग्स इंस्पेक्टर उमेश भुसे यांची  आहे.मात्र तेच  निद्रावस्थेत असल्याचे चित्र  दिसून येत आहे.त्यांनी गेल्या वर्षभरात  कोणतीही प्रभावी कामगिरी सांगोला शहर आणि तालुक्यात केली असल्याचे आढळून आले नाही. सांगोला शहर आणि तालुक्यांमध्ये अनेक मोठमोठी हॉटेल्स भेळ, वडापावचे हातगाडे  खुलेआम चालू आहेत. या सर्व खाद्यपदार्थांच्या गाड्यावर कारवाई करण्याची जबाबदारी अन्न निरीक्षक अधिकारी या नात्याने उमेश भुसे यांची असताना ते जाणीवपूर्वक अशा कोणत्याही हॉटेलवर  कारवाई करत नसल्यामुळे अशा हातगाड्या चालकांची संख्या सांगोला शहर आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याच पद्धतीने आवश्यक असणारा हॉटेल व्यावसायिकांचा परवानाही अनेक जणांकडे नसल्यामुळे ग्राहकांना हॉटेल्समधून दर्जेदार, चवीचे पदार्थ मिळत नसल्याची तक्रार अनेक खवय्यांनी केली आहे.   यावर  नियंत्रण असणारा विभाग मात्र कामगिरी विना कोमात असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. येणाऱ्या काळात तरी अन्न सुरक्षा निरीक्षक अधिकारी उमेश भुसे यांनी सांगोला शहर आणि तालुक्यात सुरू असणाऱ्या अनेक हॉटेल्स खाद्यपदार्थांचे हातगाडे  यांची तपासणी करून ग्राहकांना चांगल्या क्वालिटीचे खाद्य पदार्थ    मिळतात की नाही हे जबाबदारीने पाहावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते करत आहेत. सांगोला शहर आणि तालुक्यातील प्रत्येक गल्लीबोळात सुरू असणाऱ्या पानटपऱ्या मधून सुगंधित पान मसाल्याच्या नावाखाली गुटख्याची विक्री मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. मात्र यावर कोणतीच कारवाई अन्नसुरक्षा विभागाकडून  केलेली नाही.त्यामुळे येणाऱ्या काळात तरी अन्न सुरक्षा निरीक्षक तथा फुड अँड  ड्रग्ज इंस्पेक्टर भुसे यांनी आपली जबाबदारी ओळखून खुलेआम चालणारा गुटका  आणि नागरिकांच्या जीवितास धोका पोहोचवणारे अन्नपदार्थांचे हातगाडे, हॉटेल्स यांची तपासणी करावी अशी मागणी जनसामान्यांतून केली जात आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments