१८ मे पासून पुन्हा सामान्य जनतेला पूर्ववत पास देवून मंत्रालयात प्रवेश सुरू!

मुंबई (नासिकेत पानसरे): मंत्रालयात कामानिमित्त येणा-या अभ्यागतांना सुलभपणे प्रवेश मिळावा यासाठी राबविण्यात येणा-या व्हिपीएमएस योजनेची सेवा १८ मे पासून पुन्हा सुरू करण्यात येत आहे. याबाबतचा शासन निर्णय सोमवार दि. ९ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
या शासन निर्णयात म्हटले आहे की, कोरोना रोगाचा प्रसार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा भाग म्हणून मंत्रालयात अभ्यागतांना प्रवेश बंदी करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात कोरोना निर्बंध पूर्णत: हटविण्यात आल्यानंतर अनेक सामाजिक संघटना, राजकीय पक्षांकडून सामान्य जनतेला पूर्ववत पास देवून मंत्रालयात प्रवेश देण्यासाठी मागणी केली जात असल्याने गृहविभागाच्या वतीने शासन निर्णय निर्गमीत करण्यात आला आहे.
0 Comments