मनसे प्रमुख राज ठाकरेचे पदाधिकारी बैठकीनंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरेना पत्राव्दारे इशारा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, May 10, 2022

मनसे प्रमुख राज ठाकरेचे पदाधिकारी बैठकीनंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरेना पत्राव्दारे इशारा

मनसे प्रमुख राज ठाकरेचे पदाधिकारी बैठकीनंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरेना पत्राव्दारे इशारा 

भोंग्याच्या प्रश्नावर राज्य सरकारने अंत पाहू नये !

             मुंबई (नासिकेत पानसरे): मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज प्रमुख नेते आणि पदाधिकारी यांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, अंगात आल्यासारखे २८हजार मनसे कार्यकर्ते पदाधिका-यांची धरपकड दमनकारी कारवाई कश्यासाठी आहे? भोंग्याच्या प्रश्नावर राज्य सरकारने अंत पाहू नये असा इशारा त्यांनी दिला आहे.

             या पत्रात राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, मी आवाहन केल्यानंतर राज्य सरकार बेभान होवून अंगात अल्यासारखे का वागत आहे. ४ मे रोजी भोंगे उतरविण्यात येवू नयेत म्हणून २८ हजार मनसैनिकांची धरपकड करण्यात आली आहे ती कश्यासाठी? लोकांना त्रास देणारे भोंगे उतरवले जावू नयेत यासाठी!

             त्यांनी पुढे म्हटले आहे की आठवडाभर दडपणूक ज्या प्रकारे राज्य सरकारने केली आहे ते पाहता मला प्रश्न पडला आहे की, मशिदीमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रे आणि अतिरेकी शोधण्यासाठी कधी राबविली होती का? त्यांनी म्हटले आहे की संदिप देशपांडे आणि अन्य कार्यकर्त्याना पोलीस असे शोधत आहेत की ते पाकिस्तानी अतिरकी किंवा निजामाचे रझाकार आहेत. हिंदूच्या विरोधात अशी दमनकारी कारवाई कुणाच्या आदेशाने केली जात आहे ते जनता पहातआहे असे म्हणत त्यांनी इशारा दिला आहे की, सत्ता येत जात असते ताम्रपट घेवून आले नाही आमच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका असा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी म्हटले आहे की, राज्यातील कार्यकर्त्यावर सरकारचे जे दडपशाहीचे सत्र सुरू आहे त्याबाबत राज ठाकरे यांनी पत्राव्दारे सरकारला जाब विचारला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages