राष्ट्रवादीचा काँग्रेस पक्षाचा मार्ग अहिंसेचा व विकासाचा - महेश तपासे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, May 16, 2022

राष्ट्रवादीचा काँग्रेस पक्षाचा मार्ग अहिंसेचा व विकासाचा - महेश तपासे

 राष्ट्रवादीचा काँग्रेस पक्षाचा मार्ग अहिंसेचा व विकासाचा - महेश तपासे

           मुंबई, (नासिकेत पानसरे): भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते श्री विनायक आंबेकर यांच्यावर काही लोकांनी हल्ला केला आणि ती लोकं राष्ट्रवादीशी संबंधित आहेत असा आरोप भाजपच्या काही नेत्यांनी केलेला आहे.

           श्री आंबेकर यांच्यावर कोणी हल्ला केला हे पोलिसांनी शोधून काढावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. अनेक वेळा भारतीय जनता पार्टीची ट्रोल आर्मी समाज माध्यमांवर पवार कुटुंबातील व्यक्तीच्या बाबतीत अतिशय खालच्या पातळीवरील शब्दांचा प्रयोग करून पोस्ट निर्माण करत असतात. या सर्व गोष्टीचा मुकाबला संयमाने आम्ही करतो. विचारांची लढाई ही विचारांनीच केली पाहिजे ही शिकवण खुद्द पवार साहेबांची आहे.

           राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही महात्मा गांधी यांची सत्य व अहिंसा या तत्वांवर चालणारी पार्टी असून अशा प्रकारच्या हल्ला हा राष्ट्रवादीच्या माथी मारायचा हा राजकीय षडयंत्र आहे का? अशी शंका निर्माण होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages