उपरी येथे धर्मवीर संभाजी राजे जयंती उत्साहात साजरी

पंढरपूर, उपरी येथे धर्मवीर संभाजीराजे जयंतीनिमित्त वृक्षारोपण करताना मान्यवर
पंढरपूर (कटुसत्य वृत्त): पंढरपूर तालुक्यातील उपरी येथील धर्मवीर संभाजी महाराज चौक, तळ्याचे माळ येथे धर्मवीर संभाजी महाराज जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
शुक्रवार दि.13 रोजी स्वेरी महाविद्यालयातील प्रा.यशपाल खेडकर यांचे छत्रपती संभाजी महाराज एक झंजावात या विषयावर व्याख्यान झाले. शनिवार दि.14 मे रोजी सकाळी डिव्हीपी उद्योग समुहाचे चेअरमन अभिजीत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस व्यापार उद्योगचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे, जि.प.सदस्य तानाजी वाघमोडे, वृक्षमित्र दत्तात्रय बागल, मराठा महासंघाचे अर्जुन चव्हाण, शांतीनिकेतन गुरूकूलचे प्रा.कोंडलकर, सुभाष जगदाळे, दतात्रय मोहिते, पै.साहेबराव नागणे, सरपंच ज्ञानेश्वर चव्हाण, उपसरपंच महेश नागणे, दतात्रय नागणे, पै.सतीश नागणे, चंद्रकांत जाधव, प्रा.सुनिल नागणे, ग्रा.प.सदस्य निवास नागणे, अतुल नागणे, माजी उपसरपंच अण्णासो नागणे याच्यासह शंभुराजे जन्मोत्सव सोहळा समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थि होते. वृक्षमित्र दतात्रय बागल व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये वृक्षरोपण करण्यात आले. याच दिवशी सायंकाळी भागवताचार्य ह.भ.प आरतीताई शिंदे यांचे किर्तन पार पडले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष नागेश भोसले यांच्यासह पंचक्रोशीतील महिला व तरूण मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
रविवार दि.15 मे रोजी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरामध्ये 136 जणांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे महिलांनीही या रक्तदान शिबीरामध्ये सहभाग नोंदविला. या प्रसंगी रक्तदात्यांना छावा कादंबरी भेट देण्यात आली. जयंती उत्सव पार पाडण्यासाठी धर्मवीर संभाजी राजे चौकातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह उपरी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
जिल्ह्यातील सर्वात उंच शिवध्वज
येथील चौकामध्ये तरूणांनी एकत्र येत सर्वात उंच असा 75 फुट उंची असलेला जिल्ह्यातील सर्वात उंच शिवध्वज उभा केला असून त्या ध्वजाभवती दगडी कमान असलेला चबुतरा उभा करून संपूर्ण परिसर शिवमय केला आहे.
0 Comments