Hot Posts

6/recent/ticker-posts

सततच्या पाठपुराव्यामुळे बाजार तळावरील रस्त्याचे काम सुरू - महेश शिंदे

सततच्या पाठपुराव्यामुळे बाजार तळावरील रस्त्याचे काम सुरू - महेश शिंदे

              अकलूज (कटूसत्य वृत्त):- डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तर जनसेवा संघटना महाराष्ट्र राज्य व मैत्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून अकलूज येथील नवीन बाजारतळ  रस्त्याचे सततच्या पाठपुराव्यामुळे काम सुरू झाले असल्याची माहिती मैत्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश शिंदे यांनी दिली.    

              पुढे बोलताना शिंदे म्हणाले की रस्त्याचं नुकतंच काम चालू झाल्याने नवीन बाजार तळावरील नागरिकांना पावसाळ्यात होणारा त्रास व रस्त्याच्या दुरवस्थेमुळे दैनंदिन होणारा त्रास कायमचा मिटणार आहे.नवीन बाजार तळावरील रस्त्याच्या प्रश्‍नासाठी येथील नागरिकांनी सहभाग दर्शविला आहे. रस्त्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांना घेराव घातला होता तर विविध आंदोलने करण्यात आली असल्याचे शिंदे म्हणाले.रस्त्याचे काम सुरू झाल्यामुळे शिंदे यांनी प्रशासनाचे व सत्ताधारी लोकांचे तसेच नवीन बाजार तळावरील नागरिकांचे  आभार मानले.

Reactions

Post a Comment

0 Comments