ताराराणीच्या वेदिका शेंडेची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड !

अकलूज (कटूसत्य वृत्त):- शिवरत्न शिक्षण संस्था संचलित ताराराणी महिला कुस्ती केंद्राच्या कु.वेदिका नंदकुमार शेंडे हिने पंधरा वर्षाखालील महाराष्ट्र संघ निवड चाचणी मध्ये 39 किलो वजनी गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवत झारखंड रांची येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र झाली आहे
ताराराणी महिला कुस्ती केंद्रातील 15 वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेली कुस्ती खेळाडू कु.वेदिका नंदकुमार शेंडे पुणे येथील वारजे सह्याद्री संकुल येथे झालेल्या महाराष्ट्र संघ निवड चाचणीत 39 किलो वजन गटामध्ये मध्ये प्रथम क्रमांक मिळवला.
या यशा बद्दल शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील व उपाध्यक्षा शितलदेवी मोहिते-पाटील यांनी वेदिका शेंडे तसेच प्रशिक्षक सतपाल सिंह प्रशिक्षक सुहास तरंगे यांचा सत्कार करून झारखंड रांची येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .या वेळी संचालक एस.एम.शिंदे, पै.राहूल जगताप,पै.काकासाहेब जगदाळे उपस्थित होते.
ताराराणी कुस्ती केंद्राच्या अध्यक्षा शितलदेवी मोहिते-पाटील म्हणाल्या की, धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्ती खेळाडूंना गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत ग्रामीण भागात सुद्धा राष्ट्रीय कॉमनवेल्थ ऑलिम्पिकच्या दर्जाचे खेळाडू घडवण्याचे उद्दिष्ट देऊन आमच्या कुस्ती केंद्रात उत्तम दर्जाच्या सुविधा देत आम्ही काम करत आहोत.याचेच आज आम्हाला फलित मिळत आहे की,आमच्या कुस्ती केंद्रातील खेळाडूंची राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत निवड होत आहेत.
0 Comments