मोदींची सत्तेची ८ वर्ष म्हणजे कुशासनाची - महेश तपासे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, May 26, 2022

मोदींची सत्तेची ८ वर्ष म्हणजे कुशासनाची - महेश तपासे

मोदींची सत्तेची ८ वर्ष म्हणजे कुशासनाची - महेश तपासे

              मुंबई (नासिकेत पानसरे):- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सत्तेची ८ वर्ष म्हणजे कुशासनाची असून आरएसएसच्या विचारसरणीने देशातील जातीय सलोखा बिघडवला जात आहे असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.

              राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी आज मोदीसरकारला ८ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जोरदार टिका केली आहे.

              भाजप सरकारच्या पुढील आठ अपयशांची देशाला वारंवार आठवण येते असेही महेश तपासे म्हणाले. यावेळी वाढती महागाई, वाढलेली  बेरोजगारी, लोकशाहीची दडपशाही, राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करण्यात अपयश, द्वेषाचे राजकारण, रुपयाची ऐतिहासिक घसरण, आर्थिक कुचंबणा, सामाजिक जडणघडणीची झीज यावर महेश तपासे यांनी प्रकाशझोत टाकला. 

              मोदींच्या या ८ वर्षात देशाने खूप काही गमावले असून विज्ञान व समताऐवजी धर्म आणि जातीयवाद राज्य करत आहेत असेही महेश तपासे म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages