महामार्ग बांधणी होतानाच अनेक निष्पाप नागरिकांचे बळी

मोहोळ(कटूसत्य वृत्त):- सध्या सुरू असलेले मोहोळ पंढरपूर आळंदी महामार्गाच्या कामामध्ये सुसूत्रता आणि शिस्त काहीच जाणवत नाही. स्थानिक गाव पुढार्यांनी आपापली वाहने, मशीन विकत घेऊन महामार्गासाठी भाड्याने लावले आहेत. तर कोणी आपल्या नातेवाईकांना या मार्गामध्ये तात्पुरत्या स्वरूपातील नोकरी लावली आहे. सर तालुक्यातील अनेक अधिकाऱ्यांना ट्रीपला जाण्यासाठी याच महामार्गाच्या पोट ठेकेदारांची खाजगी वाहने मोफत डिझेल भरून पाठवली जातात. त्यामुळे या महामार्गाच्या बांधणीत जे काही गैरप्रकार चालतात त्याबाबत कोणीही आवाज उठवायला तयार होत नाही.. तालुक्यातील ही मिंधेगिरी आणखी किती दिवस चालणार आहे हे कळायला मार्ग नाही.
आज झालेला अपघातानंतर कोणीही अपघातस्थळी मदतीला आले नसल्याचे सांगितले. विशेष बाब म्हणजे अपघात झाल्यानंतर तब्बल ५२ मिनिटानंतर पोलीस आणि आरोग्य विभाग त्या ठिकाणी पोहोचला.. शिवाय हा महामार्ग नेमका किती पदरी आहे ? हे काही कळायला मार्ग नाही. कुठून पण कुठेही वाहतूक वळविण्यात आली आहे. या महामार्गावर आणखी महिनाभरात अपघात घडले तर जवळपास शंभर जणांचे बळी गेलेले असतील. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी होणारा हा महामार्ग बांधणी होतानाच अनेक निष्पाप नागरिकांचे बळी घेऊन पूर्ण होत आहे..
0 Comments