Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रा.संजयकुमार घोरपडे यांना आदर्श कार्य गौरव समाजरत्न पुरस्कार प्रदान...

प्रा.संजयकुमार घोरपडे यांना आदर्श कार्य गौरव समाजरत्न पुरस्कार प्रदान...

              बेंबळे (कटुसत्य वृत्त): मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल भारत शिक्षण संकुल ,जेऊर येथील प्रा.संजयकुमार राजेघोरपडे यांना  राज्यस्तरीय आदर्श कार्य गौरव समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. 

              सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प शामसुंदर महाराज सोन्नर - आळंदीकर, पद्मश्री डॉ. विजयकुमार शहा,इंटरनॅशनल टॅलेंट आयकॉन आंध्रप्रदेशच्या अध्यक्षा डॉ.जे.सानीपिना राव, इंटरनॅशनल सोशल आयकॉन डॉ.शुभदा जोशी यांच्या हस्ते पुण्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी महापरिषद समन्वयक प्रकाश सावंत, समुपदेशक व समाजसेविका मिनाक्षी गवळी, मनिषा कदम आदी उपस्थित होते.

              सामाजिक,शैक्षणिक,सेवाभावी कार्य,राष्ट्रप्रेम यासाठी हा आदर्श कार्य गौरव समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येत असतो.राष्ट्रीय एकात्मता,सामाजिक समता, शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी  करीत असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातून हा पुरस्कार प्रा.संजयकुमार घोरपडे यांना प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, पदक,प्रमाणपत्र,मानाची शाल,श्रीफळ, फेटा असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

              त्यांना या अगोदर  कोरोना योद्धा ,दलितमित्र,विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार,आदर्श शिक्षक पुरस्कार,महात्मा जोतीराव फुले राष्ट्रीय सन्मान पदक आदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

              या पुरस्काराबद्दल  भारत शिक्षण संकुलाचे अध्यक्ष, माजी आमदार नारायण पाटील,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, करमाळा तालुका पंचायत समितीचे माजी सभापती अतुल पाटील,उपजिल्हाधिकारी अनिल कारंडे, तहसीलदार समीर माने,करमाळा तालुका भूमी अभिलेख अधिकारी प्रकाश कांबळे,गट विकास अधिकारी मनोज राऊत ,गट शिक्षणाधिकारी राजकुमार पाटील, मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष शामराव जवंजाळ जिल्हाध्यक्ष कमलाकर बनसोडे, महेश कांबळे, करमाळा तालुकाध्यक्ष किसन कांबळे,मानवाधिकार राज्य संपर्क प्रमुख शामराव ननवरे, संजय कांबळे ,केंद्र प्रमुख भारत पांडव, राजाभाऊ गादिया ,महेश कांडेकर,भास्कर कांडेकर,महाराष्ट्र चॅम्पियन सागर माने,उमेश कांडेकर, जेऊरचे सरपंच भारत साळवे, मराठा सेवा संघाचे माढा तालुकाध्यक्ष निलेश देशमुख यांनी प्रा.राजेघोरपडे यांचे अभिनंदन केले.

Reactions

Post a Comment

0 Comments