महापालिका क्षेत्रात नव्याने १२ नागरी आरोग्य केंद्र मंजूर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महापालिका क्षेत्रात नव्याने १२ नागरी आरोग्य केंद्र मंजूर झाले आहेत. यापैकी आठ आरोग्य केंद्रांच्या बांधकामाची निविदा महिनाअखेर काढण्यात येईल. १२ वैद्यकीय अधिकारी व इतर सेवकांची नियुक्ती जिल्हा परिषदेमार्फत सुरू असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. बसवराज लोहारे यांनी बुधवारी सांगितले.आरोग्य उपसंचालकांनी शहरातील पनाश अपार्टमेंट, शास्त्री नगर शानदार चौक, शहर दवाखाना शिवाजी चौक परिसर, उंब्रजकर वस्ती, निराळे वस्ती परिसर, हुडको, सुंदरम नगर, विजापूर रोड परिसर, आयुर्वेद दवाखाना २५६ गाळे परिसर, मड्डी वस्ती, रुपाभवानी पेठ परिसर, साखर पेठ अग्निशामक केंद्राजवळ, मंगळवार पेठ, तुळजापूर वेस परिसर, शिखची दवाखाना रेल्वे लाइन परिसर, थोबडे वस्ती, रामवाडी परिसर,नीलम नगर अक्कलकोट रोड येथे आरोग्य केंद्रांना मंजुरी दिली आहे. यापैकी आठ ठिकाणी त्वरित बांधकामे सुरू होतील.बांधकामे व उपकरणे खरेदीसाठी शासनाकडून ७.४४ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या आरोग्य केंद्रासाठी आवश्यक वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिपरिचारिका, एमपीडब्ल्यू या पदांची भरती जिल्हा परिषदेमार्फत सुरू आहे.
0 Comments