उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची बाधीत इमारतींचे मूल्यांकन सार्वजनिक बांधकाम विभागाला मनुष्यबळ पुरवेल-आयुक्त पी. शिवशंकर
.png)
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरातील दोन उड्डाणपुलाच्या भूसंपादनातील बाधीत इमारतींचे मूल्यांकन सार्वजनिक बांधकाम विभागानेच करणे अपेक्षित आहे. महापालिका यासाठी बांधकाम विभागाला मनुष्यबळ पुरवेल, अशी भूमिका मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी घेतली आहे.जुना पुना नाका ते पत्रकार भवन चौक या उड्डाणपुलाच्या भूसंपादनातील बाधित मिळकतींची अधिसूचना फेब्रुवारी महिन्यात काढण्यात आली होती. दोन महिने उलटले तरी भूसंपादनाचे मूल्यांकन पूर्ण झालेले नाही.
बांधकाम विभागाने तर मनुष्यबळ नसल्याचे कारण देऊन बाधित इमारतींचे मूल्यांकन करणार नाही,अशी भूमिका घेतली आहे. या वादात भूसंपादन आणखी सहा महिने लांबण्याची शक्यता आहे. यासंदर्भात पी. शिवशंकर म्हणाले, भूसंपादनाचे काम जिल्हा प्रशासनाने पूर्ण करून द्यायचे आहे. मोजणीचे काम नगर भूमापन आणि महापालिकेने केले आहे. इमारतींचे मूल्यांकन केल्यास पुन्हा तक्रारी होतील. त्यामुळे त्रयस्थ संस्था म्हणून बांधकाम विभागाने हे काम करणे अपेक्षित आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांनी यात तोडगा काढायला हवा. लवकरच जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंदर्भात बैठक घेऊ, असेही आयुक्तांनी सांगितले.जुना बोरामणी नाका ते मोररका बंगला यादरम्यानच्या उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची अधिसूचना बुधवारी जाहीर होणे अपेक्षित होते.
0 Comments