Hot Posts

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना उमेदवारी देणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना उमेदवारी देणार

            सोलापूर (कटूसत्य वृत्त):- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लवकर निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.या निवडणुकीत ओबीसी आरक्षण असेल का नाही, यावर सध्या निर्णय झालेला नाही. मात्र सर्वच पक्ष हे ओबीसींना उमेदवारी देण्याच्या बाजूने आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना उमेदवारी देणार असल्याचे सांगितले. जिल्हा परिषदेत ७७ सदस्य संख्या आहे. २७ टक्के आरक्षण प्रमाणे जिल्हा परिषदेत २१ जागा या ओबीसींसाठी राखीव होऊ शकतात.त्याप्रमाणे राष्ट्रवादी पक्षाकडूनही उमेदवारी देण्यात ओबीसींना येणार आहे.भाजपसहित,राष्ट्रवादी तयारी काँग्रेसनेही ओबीसी उमेदवारांना उमेदवारी देण्याबाबत दर्शविली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणाले, सर्वच पक्षांना ओबीसी हवे आहेत त्यामुळे सर्वच पक्ष त्यांना उमेदवारी देतील. प्रत्यक्ष नाही तर अप्रत्यक्षरीत्या ओबीसी उमेदवारांना जागा मिळणारच.पण,केंद्र सरकार याबाबत राजकारण करत आहे. जरी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व पक्ष ओबीसींना उमेदवारी देण्यास इच्छुक असले तरी त्यांच्या प्रतिनिधित्वाचा प्रश्न मात्र कायम तसाच राहणार आहे. कारण,एखाद्या जागेसाठी ओबीसी व ओपनमधील उमेदवार निवडणूक लढू शकतात. त्यातून जर ओपनमधील उमेदवार निवडून आला तर ओबीसींचे प्रतिनिधित्वाचे काय असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. जर ओबीसी आरक्षण असते तर २७ टक्के प्रमाणे २१ जिल्हा परिषदेत त्यांना प्रतिनिधित्व मिळाले असते.

Reactions

Post a Comment

0 Comments