Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने ग्रंथालयाची कार्यशाळा

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने ग्रंथालयाची कार्यशाळा

            सोलापूर, (कटुसत्य वृत्त): जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सोलापूर येथे जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक तालुका ग्रंथालयांच्या प्रतिनिधींची कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.

            यावेळी जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी आपल्या भागातील ऐतिहासिक ठेव्याबाबत माहिती, दुर्मिळ ग्रंथ, भुजपत्रे, शिलालेख यांची संक्षिप्त माहिती तसेच या वर्षातील ग्रंथसूची तयार करण्यासाठी लेखकांनी त्यांचे प्रसिध्द केलेल्या साहित्याची माहिती तालुका ग्रंथालयांमार्फत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास सादर करावी. ही माहिती आपल्या ग्रंथालयात ठेवून ग्रंथालय हे माहिती केंद्र म्हणून निर्माण करा. त्याचा लाभ ग्रंथालयाचे वाचक, सभासद, परिसरातील विद्यार्थी, नागरीक, संशोधक, अभ्यासकांना होण्यासाठी ही माहिती उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव यांनी केले.

            कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रंथमित्र कुंडलिक मोरे यांनी मनोगतात ग्रंथालयांनी आपली सेवा अधिक कार्यक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबवावी. ही चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावे, असे म्हणून कोरोना कालावधीनंतर ग्रंथालय सेवांच्या कामात एकसूत्रता येण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले असल्याबाबत समाधान व्यक्त केले.

            कार्यशाळेला जिल्ह्यातील तालुका ग्रंथालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय ढेरे यांनी तर प्रास्ताविक ग्रंथालय निरीक्षक प्रमोद पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन प्रदिप गाडे यांनी केले.

Reactions

Post a Comment

0 Comments