Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर आगारातून सुट्यांसाठी एसटीच्या ५० जादा गाड्या

सोलापूर आगारातून सुट्यांसाठी एसटीच्या ५० जादा गाड्या

            सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दोन वर्षे कोरोना महामारीमुळे आणि त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लालपरीची चाके थांबली होती. मात्र संपानंतर सर्व कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाल्याने एसटीची सेवा पूर्ववत झाली आहे. उन्हाळा सुटीमध्ये प्रवाशांना आपल्या गावी जाता यावे, हवे तेथे प्रवास करता यावा यासाठी सोलापूर विभागाकडून २७ एप्रिल ते १५ जूनपर्यंत एसटीच्या ५० जादा बस सोडण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.

            सहा महिन्यांपासून विविध मागण्यांसह एसटी विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य केल्यानंतर कर्मचारी कामावर परतले आहेत. न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा कामावर येण्याचा निर्णय घेतला. सोलापूर विभागातील मोठ्या संख्येने वाहक- चालक कामावर आले असून, त्यामुळे सोलापूर विभागानेही उन्हाळी सुट्यांमध्ये गावाकडे अथवा पर्यटन क्षेत्राकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये त्याचबरोबर उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टिकोनातून कंबर कसली आहे. सोलापूर विभागातील नियमित गाड्यांव्यतिरिक्त ५० अतिरिक्त गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून, यातून प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. त्याचबरोबर महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. 

Reactions

Post a Comment

0 Comments