Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूरकरांचा कलाविष्कार 18 चित्रकारांचे चित्र-शिल्पप्रदर्शन; काळाघोडा येथील जहांगीर कलादालनात रसिकांना पर्वणी

सोलापूरकरांचा कलाविष्कार 18 चित्रकारांचे चित्र-शिल्पप्रदर्शन; काळाघोडा येथील जहांगीर कलादालनात रसिकांना पर्वणी

            सोलापूर (कटूसत्य वृत्त):- काळाघोडा येथील जहांगीर कलादालनात सोलापूरच्या कलाकारांचे अनोखे प्रदर्शन सुरू आहे. प्रदर्शन 9 मेपर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 7 यावेळेत कलारसिकांना विनामूल्य बघता येईल.

            प्रदर्शनात अमित आवटे, दीपक पाटील, देवेंद्र निंबार्गीकर, गोपाल डोंगे, मल्लाकार्जुन सलिमाठ, मानाक्षी रामपुरे, नितीन खिलारे, डॉ. पद्मा देशपांडे, प्रकाश पोरे, प्रवीण रणदिवे, सचिन गायकवाड, डॉ. सुहास सरवदे, विनायक पोतदार, विठ्ठल मोरे, अमरनाथ कानकी, अविनाश शिवशरण, धर्मराज रामपुरे, नितीन जाधव आदी कलाकारांनी सहभाग घेतला आहे. या प्रदर्शनाचे आयोजन सोलापूर जिल्हा आर्टिस्ट अभिनव सहकारी संस्था मर्यादित यांनी केले आहे.

            कॅनव्हास व पेपरवर असलेली तैलरंग, जलरंग, ऑक्रिलिक, मिक्स मीडिया, पेन आणि इंक वगैरेसारख्या वेगवेगळ्या माध्यमातून साकारलेली विविध शैलीतील, विषयांवरील चित्रे या समूह कलाप्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. तसेच फायबर ग्लास, मिक्स मीडियामधील शिल्पाकृतींचा समावेश आहे. यामध्ये लँडस्केपस् सिटीस्केप्स, वास्तववादी कामे, निसर्गसौंदर्य, मानवाच्या संवेदनशील मनातील विविध भावना, मुख्यतः तरुण मुली- स्त्रिया, स्मारक, आध्यात्मिक विषयावरील आणि इतर कलाकृती यांचा समावेश आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments