शिवाजी लोकरे आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झाला गौरव
लऊळ (कटुसत्य वृत्त): जिल्हा परिषद सोलापूर प्रशासनाच्या वतीने उत्कृष्ट कार्याबद्दल देण्यात येणारा सन 2018-19 या वर्षाच्या जिल्हास्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने शिवाजी नागनाथ लोकरे यांना तर आदर्श ग्रामसेविका पुरस्कार प्रमिला सुभाष नवले यांना प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देत हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
शिवाजी लोकरे हे माढा तालुक्यातील लऊळ गावचे सुपुत्र असून ते सध्या अंबड व मोडनींब येथे ग्रामसेवक या पदावर कार्यरत आहेत.
जिल्हापरिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे,माजी अध्यक्ष बळीराम साठे,माजी अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी,जयमाला गायकवाड जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच उपमुख्य कार्यकारी चंचल पाटील,इशादीन शेळकंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकरे यांना सपत्नीक सन्मानीत करण्यात आले.
लोकरे यांचे आमदार बबनराव शिंदे,संजयमामा शिंदे,महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ राज्याध्यक्ष तात्यासाहेब पाटील, गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील,रामभाऊ मिटकल,प्रताप नलवडे यांनी अभिनंदन केले.
याप्रसंगी ग्रामसेवक शंकर गवळी, सतीश भोंग,नानासाहेब सुतार, विजयकुमार माढेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाल्याने लोकरे यांचे सर्व स्तरावरून कौतुक आणि अभिनंदन होत आहे.
0 Comments