आमदारांनो जिल्ह्याचा स्वाभिमान बारामतीच्या दारात घाण ठेवू नका - प्रभाकर देशमुख
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण म्हणजे आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची व सर्वसामान्यांची दिन दलितांची भाकरी आहे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी उजनी धरणाचे दोन टीएमसी पाणी परत इंदापूरला पळविण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या जनतेच्या आशीर्वादाने निवडून आलेल्या राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस व भाजपच्या आमदारांनो व खासदारांनो डोळे असून आंधळे कान असून बहिर्याची भूमिका न घेता दोन टीएमसी पाणी रद्द करा अन्यथा राजीनामा द्या. अशी मागणी महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांनी लावून धरलेली आहे.
पुढे पत्रकारांशी बोलताना देशमुख म्हणाले, गेल्या वर्षी पण जिल्ह्याचे पालकमंत्री भरणे यांनी पार्टीमध्ये पाणी उजनीचे पळविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु जमिनीत शेतकरी संघटनेने व इतर संघटनांनी आंदोलन करून तो प्रयत्न हाणून पाडला, नंतर अजून जिल्ह्यातले पाणी दोन-तीन अशी पळविण्याचा प्रयत्न आहे. त्याला जनहित शेतकरी संघटनेचा प्रखर विरोध असेल प्रसंगी रक्त सांडू पण एक थेंबही पाणी जाऊ देणार नाही. वेळ आली तर जनहित शेतकरी संघटना सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्र्यांना पाय ठेवू देणार नाही. कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये मंगळवेढा तालुक्यातील 35 गावची योजना मोहोळ तालुक्यातील सीना भोगावती जोड कालवा व पोखरापूर तलावात पाणी सोडण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांचे सुपुत्र कॅबिनेट पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी फोडलेला नारळ याचे आत्मपरीक्षण त्यांनी केले पाहिजे तसेच इतर सिंचन योजना रखडत पडलेले आहेत. सध्याचे उजनी धरणातील 117 टीएमसी पाणी शेतकऱ्यांना तसेच पिण्यासाठी पाणीपुरवठा योजना ही अवलंबून आहेत त्यामुळे हेच पाणी कमी पडत असल्याचेही देशमुख यांनी आवर्जून पत्रकारांशी बोलताना सांगितले त्यामुळे इंदापूरच्या शेतकऱ्यांना आमचा विरोध नाही त्यांना खडकवासला व पुणे जिल्ह्यातल्या इतर 17 धरणाचे पाणी नियमाप्रमाणे मंजूर असलेले त्यांना द्यावे आणि देशाचे नेते शरद पवार साहेबांनी ही आपल्याला सोलापूर जिल्ह्यातील तमाम जनतेने शेतकऱ्यांनी ताकद दिली होती. आपण माढा लोकसभेचे खासदार होता. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होता. हेही विसरता कामा नये. असेही बोलायला देशमुख विसरलेले नाहीत. या जिल्ह्यामध्ये आमदारांच्या व विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या सुद्धा जमीन आहेत. त्यांना सुद्धा या घटनेचे गांभीर्य पाहिजे तुम्ही पक्षाच्या नेत्यांच्या दावणीचे बैल होऊ नका. अन्यथा आपल्या सर्वांची प्रपंच होत असणार आहेत हेही विसरून चालणार नाही. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष नानासाहेब मोरे, चंद्रकांत निकम, सुरेश नवले, उत्तम सरडे, बलभीम माळी, सुभाष पवार, रवींद्र मुठाळ, धर्मराज पुजारी, पप्पू दत्तू, प्रशांत पाटील, महेश बिस्किटे व संदीप मोरे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments