Hot Posts

6/recent/ticker-posts

व्ही. आर. पवार सारीच च्या वतीने सामुदायिक विवाह संपन्न

व्ही. आर. पवार सारीच च्या वतीने सामुदायिक विवाह संपन्न


नवीन पिढीवर पालकत्व चे संस्कार करण्याचा हा उपक्रम यशस्वी

           सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्रातील सर्वात मोठे साडी शोरूम म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोलापुरातील चाटी गल्ली येथील व्ही. आर. पवार सारीज प्रा. लि. च्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या पारंपारिक पद्धतीने संपन्न झाला असल्याचे प्रमुख संचालक अमर पवार व महेश पवार यांनी सांगितले.

           नवीन वेडी घरकुल येथील प्रांगणामध्ये संपन्न झालेल्या या विवाह सोहळ्यात दोन जोडप्यांचा सहभाग होता त्याला आशीर्वाद देण्याकरिता म्हणून व्ही आर पवार सारेजण चे संचालक अमर पवार सौ दिपा पवार तसेच संचालक महेश पवार व सौ गीता पवार, दीपक पवार, ओमकार पवार, श्रेयस पवार आदी आवर्जून उपस्थित होते.

           या सोहळ्याचे संपूर्ण नेटके नियोजन करण्यात आले होते नवी वेडी घरकुल च्या प्रांगणात भव्य असा मंडप उभारण्यात आलेला होता त्यात आंध्रच्या पद्धतीने वधू वरण करिता चांगले देखने देखावे उभारलेले होते.

           नवीन पिढीला पालकत्वाचे संस्कार व्हावेत आणि जे मागील सत्तर ते ऐंशी वर्षापासून आपल्यासोबत राबवत आहेत अशांच्या वारसां ची म्हणजे मुलांची, मुलींची लग्ने व्ही. आर. पवार सारिज परिवार ने जबाबदारी घेतलेला आहे ते आता प्रत्यक्षात त्यांनी उतरवलेला आहे.

ची. शिवकुमार - ची.सौ. का. वेदिका व ची. श्रीनिवास - ची. सौ. का. रजनी या दोन वधू वरांचा विवाह सोहळा नवीन विडी घरकुल येथील खडीमशीन शेजारील असलेल्या प्रंगणा मधे संपन्न झाला.

या विवाह सोहळ्यास वधू-वरांचे नातेवाईक मित्रपरिवार व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता हा विवाह सोहळा यशस्वी करण्याकरिता योगेश लोकम, किरण पद्मा, श्रीनिवास बद्दल, चंद्रकांत गाजूल तसेच व्ही. आर. पवार मधील सर्व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केला.

Reactions

Post a Comment

0 Comments