Hot Posts

6/recent/ticker-posts

येरवड्यातील सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर "मोका" नुसार 81 वी कारवाई

येरवड्यातील सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर 'मोका' नुसार 81 वी कारवाई

येरवडा येथील सराईत गुन्हेगार गुन्हेगारांच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

              पुणे (कटुसत्य वृत्त): येरवडा  पुणे शहरातील गुन्हेगारावर  आळा घालण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता  यांच्याकडून गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपी निलेश उर्फ पिन्या संजय साळवे याच्यासह त्याच्या तीन साथिदारांवर पुणे पोलीस  आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली. आहे. आयुक्तांनी आजपर्यंत 81 आणि चालु वर्षात 18 टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे.

              टोळी प्रमुख निलेश उर्फ पिन्या संजय साळवे (वय – 21 रा. यशवंतनगर, येरवडा), टोळी सदस्य आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार ओमकार उर्फ डब्या विनोद जगधने  (वय – 21 सर्वे नं 103, यशवंत नगर, येरवडा), निखिल उर्फ पप्या संजय साळवे  (वय – 20 रा. यशवंतनगर, येरवडा) आणि एका विधीसंघर्षीत बालक (वय – 16 रा. भोसले वस्ती, येरवडा) यांच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

              पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आरोपी निलेश साळवे व त्याचे साथीदार हे पोलिसांच्या अभिलेखा वरील सराईत गुन्हेगार आहेत. निलेश उर्फ पिन्या संजय साळवे आणि त्याच्या साथीदारांवर येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न , जबरी चोरी , घरफोडी , मालमत्ते विषयक जाळपोळ , बेकायदा शस्त्र बाळगणे , तसेच लोकांच्या जिवीतास धोका निर्माण करण्याच्या उद्देशाने दहशत निर्माण करणे हिंसक स्वरुपाचे व गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपींवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यांनी पुन्हा गुन्हे केले आहेत.

              आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्याचा प्रस्ताव येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख  यांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 रोहिदास पवार यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला अपर पोलीस आयुक्तांनी मंजूरी दिल्याने आरोपींविरुद्ध मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त येरवडा विभाग किशोर जाधव  करीत आहेत.

आयुक्तांची 81 वी मोक्का कारवाई

              पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत.

              शरिराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या व लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे.

              त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 81 तर मागील पाच महिन्यात 18 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

              ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 रोहीदास पवार, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव यांच्या  वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख, पोलीस निरीक्षक गुन्हे उत्तम चक्रे

Reactions

Post a Comment

0 Comments