सोलापूरात "क्यू मराठी" च्या वारीला उत्स्फूर्त प्रतिसाद
सोलापूर (कटुसत्य वृत्त): मार्च पासून भन्नाट मनोरंजनाची मेजवानी देणारी "क्यू मराठी" ही मराठी वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीला आली असून, तिला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मनोरंजनाच्या वाढत्या स्पर्धेत प्रेक्षकांशी थेट सवांद साधून त्यांची अभिरुची जाणून घेण्यासाठी चॅनल हेड नीता ठाकरे आणि प्रोग्रामिंग हेड आशुतोष बर्वे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात कॅन्टर प्रमोशन करण्याचे ठरविले.आज सोलापूरमध्ये ही वारी अवतरली होती, त्यात वाहिनीवर दिसणाऱ्या शो मधील क्रिएटर्सनी प्रेक्षकांशी सवांद साधत धमाल मस्ती केली.
सोलापूर शहरातील अनेक ठिकाणी "क्यू मराठी" वाहिनीचा एक भला मोठा कँटर उभा करण्यात आला, सुरुवातीला निवेदकाने आपल्या मराठमोळ्या आणि परंपरागत पद्धतीने दवंडी देऊन प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. थोडी खट्याळ आणि थोडी थोडी घाबरावणारी तर थोडी हसवणारी "चेटकीण" शो बच्चे कंपनीचे लक्ष वेधून घेत आहे, अल्पावधीतच या शो नी लहान मुलांना आपल्याकडे आकर्षित करून घेतले आहे. तसेच संजय नार्वेकर, तेजस बर्वे आणि ऋषी सक्सेना सारखे स्टार्स असलेला शो दणक्यात एंटरटेनमेंट देखील प्रमुख आकर्षण आहे, याच्या प्रत्येक भागात नवनवीन गोष्टी बघायला मिळणार आहेत. चमचमीत आणि झणझणीत रेसिपी शो साठी मधुरा आणि सत्यजित आहेतच आहेत आणि अस्सल मातीतल्या काळजाला भिडणाऱ्या गोष्टी "गाव भारी लय भारी" आणि "गोष्ट लय बेश्ट". या सगळ्या शो ची झलक उपस्थित प्रेक्षकांना दाखवण्यात आली. यासोबत प्रेक्षकांना काही झटपट प्रश्न-उत्तरं विचारत त्यांच्यावर बक्षिसांची उधळण करण्यात येत आहे.
या संपूर्ण कार्यक्रमाबद्दल चॅनल हेड नीता ठाकरे आणि प्रोग्रामिंग हेड आशुतोष बर्वे सांगतात कि, यापूर्वी देखील आम्ही सांगितले होते कि, ही देशातील पहिली अशी वाहिनी असणार आहे, ज्यात कलाकारांचा संच आणि त्यांच्या गोष्टींचा खजिना हा राज्यातील सगळ्या लोकप्रिय आणि भन्नाट अशा डिजिटल क्रिएटर्सने तयार केलेला आहे. प्रेक्षकांची आवड समजून घेता यावी आणि भविष्यात तशा कार्यक्रमांची तरतूद करता यावी यासाठी "क्यू मराठी" संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्या जिल्ह्यात हा उपक्रम राबवत आहे.
0 Comments