साठे परिवाराने माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची केली जयंती साजरी

माढा, (कटुसत्य वृत्त): राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख यांची जयंती माढ्यात साजरी करण्यात आली. तसेच माजी आ.धनाजीराव साठे,दादासाहेब साठे यांनी लातुर येथे जाऊन साहेबांना अभिवादन केले. माढा नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्षा अॅड मीनल साठे यांच्या प्रमुख हस्ते स्व.देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपनगराध्यक्षा कल्पना जगदाळे,नगरसेवक विकास साठे, वेदांत साठे,अजिनाथ माळी,वंदना लंकेश्वर,निर्मला थोरात,शबाना शेख, रमेश थोरात,सुधीर लंकेश्वर आदी उपस्थित होते.श्री संत कुर्मदास सहकारी साखर लि.सहकार महर्षी गणपतराव साठे नगर,पडसाळी येथे देखील स्व.विलासराव देशमुख यांची जयंती साजरी केली. बी.डी.बप्पा पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत आणि कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी प्रोडक्शन मॅनेजर बाळासाहेब पवार, सचिव चंद्रहास गायकवाड,चिफ इंजिनिअर अंकुश कोळेकर,चिफ अकौटंट रावसाहेब दुधाने,शेती अधिकारी ठवरे सो,परचेस विभागाचे अविनाश बागल, लेबर टाईम सिद्धेश्वर बिनगे,रामचंद्र हाजगुडे, अरुण मोरे,सोमनाथ बरडे,गणपत रणदिवे,सुरक्षा अधिकारी तानाजी बाबर,राजाभाऊ ताकमोगे,बालाजी देवकर,आरिफ मोमीन यांचेसह ऊस उत्पादक सभासद व कर्मचारी उपस्थित होते.माढ्यातील मित्रप्रेम रुग्णालयात नगराध्यक्षा अॅड मीनल साठे व वैद्यकिय अधिक्षक डाॅ.विकास मस्के यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी उपनगराध्यक्षा कल्पना जगदाळे,नगरसेवक चंद्रशेखर गोटे,धनाजी चवरे आदी उपस्थित होते.
0 Comments