सोलापूर जिल्ह्याला केंद्र सरकारचा कौशल्य विकास योजना पुरस्कार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती
.jpeg)
सोलापूर, (कटुसत्य वृत्त): कौशल्य विकासाबाबत उल्लेखनिय काम केल्याने सोलापूर जिल्ह्याला केंद्र सरकारचा जिल्हा कौशल्य विकास योजना पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
पुरस्काराचे वितरण केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते 9 जून 2022 रोजी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय सेंटर, जनपथ येथे होणार आहे. सोलापूरच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने कोरोना काळात बेरोजगारांचा ऑनलाईन रोजगार मेळावा घेऊन हजारो जणांना रोजगार उपलब्ध करून दिला.
सोलापूर जिल्ह्याला कौशल्य विकास योजनेंमध्ये उत्कृष्ठ काम केल्याबद्दल कौतुक पत्र मिळणार आहे. सोलापूरबरोबर सातारा, सिंधुदुर्ग, वाशिम, ठाणे या जिल्ह्यांचाही समावेश आहे.
0 Comments